वांद्रे

मुंबईतील एक मोठे उपनगर
(वांद्रा या पानावरून पुनर्निर्देशित)

वांद्रे ऊर्फ बांद्रा हे मुंबईतील एक मोठे उपनगर आहे. वांद्रे स्थानक हे मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावर आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर आहे. रेल्वे लाईनमुळे वांद्र्याचे पूर्व वांंद्रे आणि पश्चिम वांद्रे असे दोन भाग पडले आहेत.

वांद्रे is located in मुंबई
वांद्रे
वांद्रे
वांद्रे लोहमार्ग स्थानक
वांद्रे-वरळी सागरी सेतू
वांद्रे रेल्वे स्थानक

पश्चिम वांद्रे हा मुंबईतील सर्वात जास्त कॅथॉलिकांची वस्ती असलेला भाग आहे[ संदर्भ हवा ]. वांद्रे हे बांद्रा चर्चसाठी प्रसिद्ध आहे. माउंट मेरीचा बॅसिलिका पुतळा हे येथील खास आकर्षण आहे. पश्चिम वांद्रे येथील लिकिंग रोड हा खरेदीसाठी व फिरण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करतो. काही वर्षापासून पश्चिम वांद्रे हे मुंबईचे रेस्टोरंट उपनगर म्हणून ओळखले जात आहे.

वांद्रे (पूर्व) येथे मुंबई उपनगर जिल्ह्याचे, व पे अँड अकाउंट्सचे प्रशासकीय कार्यालय आहे. तो भाग वांद्रे-कुर्ले काॅम्प्लेक्स म्हणून ओळकला जातो. येथे पोहोचण्यासाठी शास्त्रीनगर, बेहरामपाडा (सुनील दत्त या खासदाराचे कार्यक्षेत्र) अश्या झोपडपट्ट्यांमधून मार्ग काढावा लागतो.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

संपादन

वांद्रे हा साष्टी बेटाचा एक भाग होता. हे २५ पाखाड्यांचे होते. त्यापैकी रानवर, शेर्ली, राजन, पाली, चुईम, चिंबई, इत्यादी गावे आजही अस्तित्वात आहेत.