वसाहतवादी इतिहासलेखन
ब्रिटिश सत्तेच्या वसाहतवादी धोरणाच्या समर्थनार्थ आणि या धोरणाला पोषक होईल,अशा प्रकारचे जे इतिहासलेखन केले गेले, त्याला वसाहतवादी इतिहासलेखन असे म्हणतात. भारतविषयक वसाहतवादी इतिहासलेखनात करणाऱ्यांत प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी व ख्रिश्चन धर्मप्रसारक यांचा समावेश होतो. अशा इतिहासलेखनात भारतीय इतिहास व संस्कृती गौण दर्जाची असल्याचे सूचित केले आहे. केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे पाच खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे प्रमुख उदाहरण आहे.[१],[२]
- ^ de Suremain, Marie-Albane (2018-12-20). "Colonial History and Historiography". Oxford Research Encyclopedia of African History. Oxford University Press. ISBN 978-0-19-027773-4.
- ^ वसाहती साम्राज्य