वर्ल्ड वन (मुंबई)

(वर्ल्ड व्ह्यू या पानावरून पुनर्निर्देशित)

वर्ल्ड वन ही एक २८०.२ मीटर उंचीची मुंबई येथील ७६ मजली गगनचुंबी इमारत आहे. [] २०२४ पर्यंत, ही भारतातील दुसरी सर्वात उंच पूर्ण झालेली इमारत आहे. []ही इमारत बंद पडलेल्या श्रीनिवास मिलच्या ७.१-हेक्टर (१७.५-एकर) जागेवर आहे. येथे आणखी दोन टॉवर्स आहेत: वर्ल्ड व्ह्यू आणि वर्ल्ड क्रेस्टस लोढा समूहाने ही इमारत विकसित केली आहे.

वर्ल्ड वन (मुंबई)
वर्ल्ड वन (मुंबई)
विश्वविक्रमी उंची
सर्वसाधारण माहिती
Status Completed[]
शहर मुंबई
पायाभरणीचा दिवस 23 July 2010
Opening 2020[]
तांत्रिक माहिती
बांधकाम
Website
www.lodhagroup.com/projects/residential-property-in-worli/lodha-world-one

वर्ल्ड वन ची बांधणी अंदाजे US $321दशलक्ष पेक्षा जास्त खर्चात झाली. २०११ मध्ये बांधकाम सुरू झाले आणि ते ४४२ मी (१,४५० फूट) असणे अपेक्षित होते. त्या उंचीसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण कडून मंजूरी मिळवण्यात विकासक अयशस्वी ठरल्याने, प्रकल्प काही वर्षे रखडला होता. [] विलंबानंतर, प्रकल्पाची सध्याच्या उंचीवर पुनर्रचना करण्यात आली आणि पूर्ण झाली.

वर्ल्ड वनचे वास्तुविशारद पेई कोब फ्रीड अँड पार्टनर्स आहेत. स्ट्रक्चरल इंजिनीअर आहेत लेस्ली ई. रॉबर्टसन असोसिएट्स [] आणि एमईपी इंजिनिअर बुरोहॅपोल्ड इंजिनिअरिंग आहेत. संपूर्ण प्रकल्पात तीन टॉवर आहेत. यात दोन बांधकाम नागरी कंत्राटदार सहभागी होते: अरेबियन कन्स्ट्रक्शन कंपनी आणि सिम्प्लेक्स (वर्ल्ड वन), मस्कोविट ग्रुप (वर्ल्ड क्रेस्ट, वर्ल्ड व्ह्यू). []

संदर्भ

संपादन
  1. ^ "World One". Emporis. 22 December 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ "World One, Mumbai". skyscraperpage.com. 2022-01-06 रोजी पाहिले.
  3. ^ "Media Kit.cdr" (PDF). 10 May 2019 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 16 July 2010 रोजी पाहिले.
  4. ^ "The Skyscraper Center". www.skyscrapercenter.com. 2023-10-25 रोजी पाहिले.
  5. ^ RAI, Dipu (13 September 2018). "DNA MONEY EXCLUSIVE: Lodha 'World One' buyers move RERA over tallest claim". dna (इंग्रजी भाषेत). 29 November 2018 रोजी पाहिले.
  6. ^ "Lodha announces Residential Tower | Projects | Construction News". ConstructionWeekOnline.in. 16 July 2010 रोजी पाहिले.
  7. ^ "World View and Crest". 2018-08-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-03-08 रोजी पाहिले.