वर्ग चर्चा:तुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by V.narsikar

@अभय नातू आणि माहितगार:

वर्ग:तुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने या वर्गातील चित्रे हटविण्याची कामे, ५-७ लेख सोडले तर, जवळपास पूर्ण झाली आहेत. आता सध्या या वर्गात जे लेख बाकी आहेत त्यात सदस्य पाने आहेत,विकिपीडियाची काही पाने व साचे, /docपाने आहेत, ज्यात उदाहरणादाखल संचिकादुवा दिलेला आहे,(Example) ज्यातील संचिका दुवा तुटला आहे.यास्तव ती पाने येथे दाखल होत आहेत. तसेच काही खेळासंबंधी(sports), ते साचे/लेख आहेत, ज्यात वापरण्यात आलेल्या साच्यातील चित्र/चित्रे कॉमन्सवरुन काढण्यात आल्यामुळे त्या साच्यात 'तुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने' हा वर्ग लागतो व पर्यायाने तो साचा ज्या लेखात वापरला आहे, तेथेही तो वर्ग लागतो.तेथे संपादन करणे शक्य नाही.तसेच सदस्यपानांवर संपादन करणे योग्य नाही असे मला वाटत आहे.

काही महत्वाचे मोजकेच(१०-१२) लेख उरले आहेत, ते सावकाशीने करण्यात येतील.(जवळपास १% पेक्षाही कमी)

२९ऑगस्ट २०१७ ते २२ सप्टेंबर २०१७ या कालावधीत हे काम करण्यात आले.

या वर्गात मी संपादन चालू करतेवेळी (कॉमन्सेथॉन) एकूण १७५३ लेख होते.त्यात आता १८१ लेख उरले आहेत.म्हणजे १५७२ संपादनक्षम लेखांवर संपादन केल्या गेले.माहितीस्तव हा गोषवारा.--वि. नरसीकर (चर्चा) ०८:५६, २२ सप्टेंबर २०१७ (IST)Reply

नरसीकरजी,
या मोठ्या कामाचा उरक पाडल्याबद्दल मराठी विकिपीडियनांकडून धन्यवाद! तुमच्यासारखे संपादक असल्यामुळेच मराठी विकिपीडीया आज येथवर आला आहे. अधिक गाजावाजा न करता कामांचा धडाका लावणे हे आजकाल बोलबच्चनांच्या मेळाव्यात क्वचितच आढळते.
तुमच्या या कामगिरीतून स्फुर्ती घेउन इतर संपादकही अशीच एकएक कामे हातावेगळी करतील अशी आशा!
अभय नातू (चर्चा) १३:०६, २२ सप्टेंबर २०१७ (IST)Reply

@अभय नातू:

आपण दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभार मानायचे राहुनच गेले. मनःपूर्वक आभार.--V.narsikar (चर्चा) १०:५३, १ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

यापुढे येणाऱ्या सदस्यांना मार्गदर्शनपर माहिती संपादन

वर्ग:तुटलेल्या संचिका दुव्यासह असणारी पाने संपादन

वर्ग:तुटलेल्या संचिका दुव्यासह असणारी पाने या वर्गात लेख दाखल होण्यात घडणाऱ्या संभाव्य चुका:

  • Find and replace हे साधन वापरतांना संचिकेतील File:........ किंवा चित्र:........ यातील मजकूराचे मराठीकरण होणे. उदाहरणार्थ:[[Image:BattleCoralSea Shokaku g17031.jpg]] या चित्राचे चित्र:BattleCoralSea शोकाकु g17031.jpg असे होणे. त्यामुळे या चित्राचा लाल दुवा दिसतो.
  • उदाहरणार्थ: मोगूबाई कुर्डीकर.jpg ही संचिका कॉमन्सवरुन वगळली जाणे
  • एखाद्या संचिकेत .jpg , .jpeg ,.svg , किंवा .png या extension मध्ये कॉमन्सवर बदल होणे.
  • कॉमन्सवर coral_sea_battle.jpg याऐवजी coral sea battle.jpg असा बदल होणे.
  • एकादे सील, लोगो प्रताधिकारीत म्हणून वगळला जाणे.
  • संचिका चढविल्यावर त्यात योग्य वर्णन, वर्ग , इतर माहिती न टाकणे. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या इतर भाषिक लोकांचा गैरसमज होउन ती उत्पात किंवा अन्य कारणाने वळगल्या जाणे.
  • मुळात एखाद्या साच्यातच चित्राबाबतचा दोष असणे व तो साचा लावलेली पाने या वर्गात दाखल होणे. उदा: " साचा:श्रीलंका प्रीमियर लीग " या साच्यात चित्र नव्हते. ते टाकल्यावर ज्या लेखात हा साचा लावला होता ती पाने आपोआप या वर्गातून निघालीत.
  • चित्राच्या शीर्षकातील त्रुटी काढण्यात आल्यामुळे/शीर्षक बदलल्यामुळे न दिसणे, उदा. पूर्वी: "चित्र:Khashaba jadhav.jpg" नंतरचा बदल: :चित्र:Khashaba Jadhav.jpg" तसेच, चित्र: Rabridevi.jpg या ऐवजी चित्र: Rabri Devi.jpg असा बदल होणे.
  • भारतासंबंधी संचिका, मराठी विकि व भाषेच्या दृष्टीने कॉमन्सवर प्रचंड काम करणे बाकी व अत्यावश्यक आवश्यक आहे.
  • लेखाच्या डावीकडच्या कडपट्टीत (साईडबार) 'इतर प्रकल्पात' याखाली विकिमिडिया कॉमन्स अथवा विकिस्पेशीज् असे लिहिले असते. तो दुवा त्या लेखासंबंधी चित्रांवर घेउन जातो. तसेच 'कॉमन्सवर.......संबंधी संचिका आहेत' हा लेखाचे खालचे बाजूस असणारा साचाही थेट कॉमन्सवरचा दुवा दाखवितो व टिचकल्यावर तेथे नेतो.
  • असे वरीलप्रमाणे दुवे उपलब्ध नसतील तर मात्र कॉमन्सवर जाऊन शोधावे लागते.
  • कॉमन्सवर करावयाची अत्यंत महत्त्वाची कामे:

खाली असणाऱ्या वर्गातील चित्रे ओळखल्या गेल्यास ती योग्य वर्गात जातील व अनेक चित्रे विनासायास उपलब्ध होतील.

आणि सरतेशेवटी


    • इंग्रजी विकिवर अनेक चित्रे आहेत जी प्रताधिकारीत आहेत अथवा नाहीत. ती कॉमन्सवर चढविण्याचे काम सांगकाम्याद्वारे सुरू आहे. कालांतराने ती उपलब्ध होऊ शकतात.

समस्या असणारी पाने संपादन

खालील पानांत वापरण्यात आलेला साचा/साचे {{iclteamflag}} यातील चित्रे कॉमन्सवरुन/आपल्या विकिहून उडविण्यात आल्यामुळे त्यात सर्व ठिकाणी चित्राचा लाल दुवा दिसतो.

तसेच,

"तुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने" पानाकडे परत चला.