वनवासी कल्याण आश्रम

भारतीय समाज कल्याण संस्था

वनवासी कल्याण आश्रम हे वनवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी कटिबद्ध असलेली संघटना आहे. ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत संस्था आहे. आदिम अवस्थेत राहणारा हा वर्ग भारतात आदिवासी म्हणून ओळखला जातो. काबाडकष्ट करून उपजीविका चालविणारा हा समाज आहे.

इतिहास

संपादन

या संस्थेची स्थापना २६ डिसेंबर इ.स. १९५२ मध्ये बाळासाहेव देशपांडे यांनी केली. या कार्याला ठक्करबाप्पागोळवलकरगुरुजी यांनी स्फूर्ती दिली. विशाल दृष्टिकोन घेउन विविध सेवाकार्याच्या माध्यमातून कार्याची सुरुवात झाली. शिक्षण, आरोग्य, आर्थिक विकास, श्रद्धाजागरण संस्कार असे विषय घेउन सेवाप्रकल्प उभे केले गेले. या साऱ्या प्रकल्पाच्या माध्यमांतून देशभरातील वनवासी क्षेत्रात एक शक्‍ती निर्माण झाली आहे असे मानले जाते.

उद्दिष्ट

संपादन

आपल्याच समाजाचे,. येथील प्राचीन व गौरवशाली परंपरेचे अभिन्न अंग असलेल्या वनवासी बांधवांची सर्वांगीण उन्नती साधून त्याला एवढे सामर्थशाली बनवणे की राष्ट्रउभारणीच्या कार्यातही हा समाज आपले योगदान देऊ शकेल.

महाराष्ट्र

संपादन

महाराष्ट्रात वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याचा प्रारंभ इ.स. १९७८ साली झाला. या ३० वर्षामध्ये केलेल्या कामाचा प्रभावाने सुशिक्षित, सुसंस्कारित व प्रतिष्ठित वनवासी युवकांची पिढी तयार झाली आहे. तसेच आपल्या समाजाचा विकास आपणच केला पाहिजे अशी भावना बाळगणारे युवक पुढे येत आहेत. वैद्यकीय सेवा व आरोग्यरक्षक योजनेच्या माध्यमातून वनवासी बांधवांच्या वेदना दूर करण्याचे प्रयत्न झाले आहेत. श्रद्धाजागरणाच्या कार्यामुळे अराष्ट्रीय कारवायांना खीळ बसली आहे. आपल्या वनवासी बांधवांची उन्नती करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असा विचार करून समर्पितपणे कार्य करणारे हजारो शहरी तसेच आंतरराष्ट्रीय कार्यकर्ते तयार झाले आहेत. एकलव्य खेलकूद स्पर्धेमुळे वनवासी क्षेत्रातील खेळातील प्रगत खेळाडूंना दिशा मिळाली आहे. वनवासी महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उद्योग-व्यवसाय प्रारंभ करून आपल्या कुटुंबाचा व गावाचा आर्थिक विकासा साधण्यात यश मिळवले आहे.

समस्या

संपादन

इ.स. १९७०पासून महाराष्ट्राची वाटचाल प्रेरणादायक असली तरी वनवासी क्षेत्रात अद्यापही समस्यांचा डोंगर उभा आहे. पूर्वीची आव्हाने तर आहेतच, पण त्यात काळानुरूप नव्याने भर पडत आहे. या साऱ्या समस्यांचा सामना करून वनवासी समाजाला अधिक शक्तिशाली बनवण्याचे कार्य आपण सर्वाना मिळून पूर्ण करायचे आहे. आतापर्यंतची वाटचाल हजारो हातांच्या बळावर शक्य झाली पण या क्षेत्रातील समस्या पाहता आता लाखो हातांची आवश्यकता भासणार आहे. या कार्यात आपण तन-मन-धनाने सहभागी व्हावे असे वनवासी कल्याण आश्रमाचे आवाहन आहे.

महाराष्ट्र राज्य सद्यस्थिती (जून २००९ )

संपादन
शैक्षणिक प्रकल्प
  • वसतिगृहे १९
  • प्राथमिक शाळा २
  • माध्यमिक शाळा २
  • बाल संस्कार केंद्रे १२
  • लाभार्थी १,६००
आर्थिक विकास प्रकल्प
  • औद्योगिक शिक्षण केंद्र २८
  • शेतकी प्रकल्प ४
  • बचत गट ५५८
  • लाभार्थी १६,०००
आरोग्य प्रकल्प
  • साप्ताहिक आरोग्य केंद्रे ४
  • दैनिक केंद्रे १
  • आरोग्य रक्षक ५८६
  • लाभार्थी ४,००,०००
इतर
  • खेलकूद केंद्रे १५
  • श्रद्धा जागरण केंद्रे ६०
  • एकूण प्रकल्प १,१२३
  • पूर्णवेळ कार्यकर्ते ८१ ( पुरूष ६५, महिला १६)
  • ग्राम समिती २१८
  • महिला समिती ६५

अपेक्षा

संपादन

वनवासी कल्याण आश्रम मानते की विद्यार्थांच्या वसतिगृहाचा एका महिन्याचा खर्च साधारणपणे रू. १५,०००/- इतका येतो. ही मदत सामान्य जनांच्या आवाक्यातील आहे व त्यामुळे एका व्यक्तीचे आयुष्य बदलते असा दावा वनवासी कल्याण आश्रमातर्फे केला जातो. शुभप्रसंगी व प्रियजनांच्या आठवणीप्रीत्यर्थ प्रासंगिक देणगी सामान्य जनांनी द्यावी असेही आवाहन केले जाते. आश्रमाच्या कार्यासाठी वेळ देणे, आश्रमाच्या वैद्यकीय केंद्रासाठी औषध संकलनास मदत करणे, वनवासी परिसरात सांस्कृतिक भवन उभारणीस साहाय्य करणे, कल्याण आश्रमाच्या केंद्रास नियमित/प्रासंगिक भेटी देणे असे अजून काही आवाहने आश्रमातर्फे केली गेली आहेत असे दिसून येते. तसेच वस्तुरूप देणगी म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेशाचे कापड व अन्य शालेय साहित्य, धान्य, अन्य मदत मागितली जाते.

वनवासी कलांच्या उत्कर्षासाठी वनवासी कलेस प्रोत्साहन म्हणून दिवाळी भेटकार्डे, दिनदर्शिका व राख्या विकल्या जातात.

वनवासी कल्याण आश्रम यांना दिल्या जाणाऱ्या सर्व देणग्या आयकराच्या ८०जी कलमाखाली सवलतीस पात्र आहेत असा दावा केला जातो.

बाह्य दुवे

संपादन