महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. कर्ता दामोदर पंडित. भागवताच्या दशमस्कंधाच्या १२, १३, १४ व्या अध्यायावर याची कथा बेतलेली आहे. सुमारे ५०० ओव्या. सूत्रपाठासारख्या तांत्रिक ग्रंथापेक्षा, पंथप्रचार ललितकाव्याद्वाराच अधिक प्रमाणात व सुलभतेने होईल, हे ध्यानी घेऊन दामोदराने ही कथा निवडली आहे. ब्रह्मदेवाकडून वत्सांचे हरण व श्रीकृष्णाकडून त्याचे गर्वहरण व श्रीकृष्णस्तवन हा काव्यविषय आहे. दामोदरपंडिताचा कवित्वाचा विलास वृंदावनवर्णन, यमुनावर्णन, श्रीकृष्णमूर्तीवर्णन यांमधून प्रकर्षाने जाणवतो. श्रीकृष्णवर्णन आणि पंथाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार हे दुहेरी कार्य दामोदरांनी साधले आहे.

वछाहरण
लेखक दामोदर पंडित
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार ग्रंथ

हे सुद्धा पहा

संपादन