कोणत्याही प्रकारच्या असंमत लैंगिक छळास लैंगिक शोषण अशी संज्ञा आहे. कोणाच्याही मनाविरुद्ध केलेला कोणताही शारीरिक जवळिकीचा प्रयत्न लैंगिक शोषण या सदरात मोडतो. सहकारी, कर्मचारी, कोणीही व्यक्ती जर कोणत्याही प्रकारे अशी मनाविरुद्ध शारीरिक जवळीक साधायचा प्रयत्न करत असेल तर ते शोषण प्रकारात मोडते. अश्लील विनोद करणे, दिसण्यावरून, पोषाखावरून भाष्य करणे,अश्लीलतेने कोंडून ठेवणे , काम करताना द्वयर्थी (वरवर सहज, पण ज्यातून अश्लील अर्थ सूचित होऊ शकतो अशी) भाषा वापरणे, मनावर विचित्र ताण येईल असे वागणे. असे सर्वच प्रकार लैंगिक शोषणामध्ये मोडतात. याशिवाय उगाचच स्पर्श करणे, रोखून पाहत राहणे, अप्रत्यक्षपणे शरीरसुखाची मागणी करणे, चिकटून उभे राहणे, स्वच्छतागृहात अश्लील मजकूर लिहिणे, मुद्दाम एकटक रोखून पाहत राहणे, इत्यादी प्रकारे शोषण होऊ शकते. लैंगिक शोषण हे एका प्रकारे हिंसेचेच दुसरे रूप आहे असे मानले जाते.

कायदा संपादन

अधिक माहिती संपादन

बाह्य दुवे संपादन