ला हंटा (कॉलोराडो)

(ला हंटा, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)

ला हंटा हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. ओटेरो काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ७,३२२ होती.[]

ला हंटा शहराची सीमा आणि मुख्य रस्ता

आर्कान्सा नदीच्या काठावर वसलेले हे शहर सांता फे पायवाट आणि पेब्लोला जाणाऱ्या प्राचील रस्त्याच्या तिठ्यावर असल्याने याला ला हंटा (स्पॅनिशमध्ये तिठा) हे नाव दिले गेले.[][] बेंट्स फोर्ट हा जुना गढीवजा किल्ला येथून जवळ आहे.

शिकागो ते लॉस एंजेलस दरम्यान धावणारी साउथवेस्ट चीफ ही रेल्वेगाडी ला हंटाला थांबते.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Government Printing Office. pp. 179.
  3. ^ Dawson, John Frank (1954). Place names in Colorado: why 700 communities were so named, 150 of Spanish or Indian origin. Denver, CO: The J. Frank Dawson Publishing Co. p. 30.