लाहुरादेवा
लहुरादेवा (अक्षांश २६°४६'१२" उ ; रेखांश . ८२°५६'५९" पू) हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील ऊर्ध्व गंगेच्या मैदानाच्या सरायूपार (ट्रान्स-सरयू) भागात संत कबीर नगर जिल्ह्यात स्थित आहे. सरयूपरच्या मैदानाच्या पश्चिमेस व दक्षिणेस सरयू नदी, उत्तरेस नेपाळ तराई आणि पूर्वेस गंडक नदीच्या सीमेवर आहे.
१३००० इ.स.पू. पासून या स्थळाच्या व्याप्तीची नोंद आहे,[१] आणि ७००० इ.स.पू. मधील दक्षिण आशियातील सिरॅमिक्सचा सर्वात जुना पुरावा या स्थळी उपलब्ध आहे. [२] [३]
तांदळाच्या लागवडीसाठी दक्षिण आशियातील पुरातन स्थळांच्या उत्खननात नोंद झाली, लहुरादेवाकाळ IA मधील नमुने कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीने ७ व्या सहस्रकातिल असल्याचे आढळले आहे. [४]
संदर्भ
संपादन
- ^ Colin Renfrew; Paul Bahn. The Cambridge World Prehistory. Cambridge University Press. p. 1335.
- ^ Peter Bellwood; Immanuel Ness. The Global Prehistory of Human Migration. John Wiley & Sons. p. 250.
- ^ Gwen Robbins Schug; Subhash R. Walimbe. A Companion to South Asia in the Past. John Wiley & Sons. p. 350.
- ^ Early Farming at Lahuradewa; Rakesh Tewari, R.K. Srivastava, K.S. Saraswat, I.B. Singh, K.K. Singh