लगोरी हा एक महाराष्ट्र व अन्य राज्यांमध्ये प्रचलित असलेला एक पारंपारिक खेळ आहे. लगोऱ्या, चेंडू एवढेच साहित्य, साधे सोपे नियम व छोटेसे मैदान हे या खेळाचे वैशिष्ट्य आहे .

खेळाचे स्वरूप व नियम

संपादन

७ वा ११ खेळाडूंचे असे दोन संघ असतात.

या खेळात वापरल्या जाणाऱ्या चपट्या लाकडी गोल ठोकळ्यांना लगोरी म्हणतात. पूर्वी ही लगोरी फरशीच्या व विटांच्या तुकड्याची असे. प्रत्येक संघातील एक एक खेळाडू लगोरी फोडण्यासाठी येतो. त्यास नेमक्षेत्रातून म्हणजेच क्रीडांगणाच्या मध्यरेषेपासून ४.५७ मीटर(१५ फूट) ते ९.१४ मीटर(३० फूट) अंतरावर १.८२ मीटर(६ फूट) लांबीची समांतर नेमरेषा आखतात. या रेषेभोवतीचा काटकोन चौकोन म्हणजे नेमक्षेत्र होय. लगोरी फोडण्यासाठी तीन वेळा चेंडू मारण्याची संधी मिळते. लगोरी फोडण्यासाठी फेकलेला चेंडू अडविण्यासाठी वा झेलण्यासाठी रचलेल्या लगोरीच्या मागे विरुद्ध संघाचा एक प्रमुख क्षेत्ररक्षक व इतर दहा क्षेत्ररक्षक आखलेल्या मोठ्या वर्तुळात लगोरी रचणाऱ्या खेळाडूंचा विचार करून उभे केलेले असतात. लगोरी फोडणारा लगोरी फोडतानाही बाद हाऊ शकतो. तो लगोरी फोडण्याचा प्रयत्न करीत असता त्याचा जमिनीवर टप्पा पडून उडालेला चेंडू जर लगोरीमागील किंवा शेजारील क्षेत्ररक्षकाने वरचेवर झेलला तर तो बाद होतो. लगोरी मारणाराने लगोरी फोडली की उडालेला वा पडलेला चेंडू लगोरी रचणाऱ्या खेळाडूंपैकी एकानेच एकदाच पायाने लाथाडायला परवानगी असते. ज्यांनी लगोरी फोडली हे त्याच संघातील खेळाडूंनी लगोऱ्या एकावर एक रचणे महत्त्वाचे असते. क्षेत्ररक्षकांचे अशा वेळी काम असते, लगोरी लावणाकाला चेंडूरणे. असा चेंडू एकाला जरी लागला तरी सर्व संघ बाद होतो. मात्र क्षेत्ररक्षकांकडून चेंडू न लागता जर लगोरी रचली तर त्या संघास एक गुण मिळतो. एखाद्या खेळाडूस चेंडू लागून तो संघ जर बाद झाला तर दुसरा संघ खेळण्यास येतो. प्रत्येक संघाच्या सर्व खेळाडू

लगोऱ्याच्या सामन्यात प्रत्येक डावास ८ मिनिटे वेळ असतो. प्रक बाजूचे दोन डाव खेळवले जातात. खेणा पक्षास लगोरी पाडण्याबद्दल प्रत्येक वेळी २५ गुण मिळतात. लगोरी रचण्याबद्दल प्रत्येक लगोरीस ५ गुण असतात. मारणाऱ्या पक्षास गड मारण्याबद्दल प्रत्येक गडयास गुण मिळतात. ८ मिनिटांच्या आंत विरुद्ध बाजूचे सर्व गडी मारून डाव पुरा केल्यास राहिलेल्या प्रत्येक मिनिटास ५ गुण मिळतात. यमांचे उघन केल्यास प्रत्येक नियघनाबद्दल ५ गुण कमी करतात. सामान्यासाठी क पंच व क हिशेबनीस असतो. पंच डाव चालू असताना गडी मेद्दल किंवा निमांचे उघन झालचा व इतर तक्रारींचा निकाल देतात.[]

  1. ^ श्रीधर व्यंकटेश केतकर. "लगोर्‍या". २२ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)