लक्ष्मीबाई वैद्य

(लक्ष्मीबाई पटवर्धन या पानावरून पुनर्निर्देशित)

लक्ष्मीबाई वैद्य (माहेरच्या पटवर्धन; ३० जून, इ.स. १९०४ - १९६८) या पाकक्रियेवरचे पहिले पूर्ण मराठी पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका होत्या.

शिक्षण कारकीर्द आणि प्रवास

संपादन

१९२८ ते १९३५ या काळात या बनारस विद्यापीठाच्या मुलींच्या शाळेत शिक्षिका होत्या. तेव्हा त्या मध्य प्रदेशात कामासाठी फिराच्या. त्यानंतर त्या पुण्याच्या हुजूरपागा शाळेत गृहशास्त्र विषयाच्या मुख्य शिक्षिका झाल्या. त्यांनी शाळा-महाविद्यालयांतील परीक्षिका या नात्याने भारतातील अनेक ठिकाणांना भेट दिली. याशिवाय त्या इंग्लंड, अमेरिका, फ्रांस, इटली, इ. देशातही गेल्या.

गृहशास्त्रावरील परिपूर्ण पुस्तक

संपादन

तीस वर्षांच्या पाकशास्त्र विषयाच्या शिक्षणाच्या आपल्या अनुभवावर त्यांनी १९६९ मध्ये पाकसिद्धी नावाचे पुस्तक प्रकाशित केले. २०१६ साली या पुस्तकाची पाचवी आवृत्ती परिपूर्ण पाकसिद्धी या नावाने प्रसिद्ध झाली. पुस्तकाच्या पहिल्या दहा प्रकरणांमध्ये स्वयंपाक करण्यापूर्वी त्यामागील शास्त्र, आहार, आरोग्य यांची माहिती देणारी आहेत. शिवाय वजने-मापे, स्वयंपाकघराची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, भांडीकुंडी व उपकरणे यांची निवड आणि देखरेख, भाजीपाला, किराणा सामान कसे निवडावे, अन्न शिजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, त्या मागची शास्त्रीय कारणे, तसेच पदार्थाची आकर्षक मांडणी, सजावट, दूधदुभते, सरपण इतकेच नव्हे तर मोरी आणि संडासाची स्वच्छता हे विषय सविस्तर हाताळले आहेत. पुढची प्रकरणे प्रत्यक्ष पाककृतींसाठी आहेत.

पुस्तकात केलेले पदार्थांचे वर्गीकरण

संपादन

पुस्तकात भाज्यांसकट सर्वच खाद्यपदार्थांचे वर्गीकरण केले आहे.

पाककृतींचा शोध घेणे सोपे व्हावे यासाठी पुस्तकाच्या शेवटी विषयसूची दिलेली आहे.