रोहित नागदिवे हे विदर्भातले एक पत्रकार व मराठी कवी होते. त्यांचा जन्म इ.स. १९६३चा. त्यांचे निधन ९ जून, इ. स. २०१२ रोजी झाले. ’नागपूर पत्रिका’, ’जनवाद’,”सकाळ’,’मतदार’ आदी वर्तनमानपत्रांचे ते उपसंपादक होते. १२ नोव्हेंबर इ. स. २०११ला नागपूर येथे झालेल्या चौथ्या आंबेडकरी युवा साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. चंद्रपूर, कळंब आणि परभणी येथे भरलेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनात झालेल्या कवि-संमेलनात त्यांचा सहभाग होता.

रोहित नागदिवे
जन्म इ.स. १९६३
मृत्यू ९ जून, इ. स. २०१२
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा कवी

’स्थितीचा ओला कोलाज’ हा रोहित नागदिवे यांचा गाजलेला कवितासंग्रह. त्याचे प्रकाशन कवी नामदेव ढसाळ यांच्या हस्ते झाले होते.

पहा: मराठी साहित्य संमेलने