रोहिंग्या
रोहिंग्या हा पश्चिम म्यानमारमधील आरकान प्रांतातील मुस्लिम समाज आहे. जगभरात २० लाखावर रोहिंग्या लोक आहेत. म्यानमारमध्ये यांची संख्या सर्वाधिक आहे. २०१२ च्या आकडेवारीनुसार, म्यानमारमध्ये ८,००,००० रोहिंग्या लोक होते, तर २०१७ पर्यंत ही संख्या १३,००,००० वर पोहचली. भारतमध्ये ह्या समाजाची ३६,००० लोकसंख्या आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मतानुसार रोहिंग्या समाज हा जगातील सर्वात पीडित समाज आहे.[९] अनेक रोहिंग्या हे शेजारी बांग्लादेश आणि थायलंड-म्यानमार सीमावर्ती भागातील अनिवासी कँपमध्ये राहत आहेत.
रोहिंग्या | ||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
रोहिंग्या लोक | ||||||||||||||||||
एकूण लोकसंख्या | ||||||||||||||||||
१५,४७,७७८ - २०,००,०००+ | ||||||||||||||||||
लोकसंख्येचे प्रदेश | ||||||||||||||||||
म्यानमार (आरकान), बांग्लादेश, मलेशिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, थायलंड, भारत | ||||||||||||||||||
| ||||||||||||||||||
भाषा | ||||||||||||||||||
रोहिंग्या भाषा | ||||||||||||||||||
धर्म | ||||||||||||||||||
इस्लाम |
नावाची उत्पत्ती
संपादनरोहिंग्या नावाच्या उत्पत्तीबद्दल अनेक विचार प्रवाह आहेत. रोहिंग्या इतिहासकार खलिलूर रहमान यांच्या मते अरबी शब्द 'रहम' म्हणजे 'दया' या शब्दापासून उत्पन्न झाला आहे. इ.स. ६ व्या शतकात अरबी व्यापारी प्रवास करत असताना रामरी बेटाजवळ जहाज बुडू लागले. व्यापारी जीव वाचवण्यासाठी नजिकच्या बेटावर उतरले आणि तेथील राजाच्या हाती लागले. राजाने व्यापाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा फर्मावली आणि व्यापारी 'रहम' - 'रहम' असा घोष करू लागले. त्याच शब्दाचा पुढे अपभ्रंश होऊन 'रोहांग' आणि पुढे 'रोहिंग्या' हा शब्द कायम झाला. आरकान मुस्लिम संघटनेचे सदस्य जहीरुद्दीन अहमद आणि नाझीर अहमद यांच्या मते त्या व्यापारी मुसलमानांना 'थंबू क्या' या नावाने ओळखले जाते. रोहिंग्या समाजाचे मूळ हे अफगाणिस्तानमधील रुहा समाजात असल्याचे त्यांचे मत आहे. इतिहासकार एम.ए. चौधरी यांच्या मते 'म्रोहाँग' राजवटीच्या नावावरून 'रोहिंग्या' हा शब्द निर्माण झाला.
संदर्भ
संपादन- ^ July 2012|date=June 15, 2012|agency=[Inter Press Service Ethnic Cleansing of Muslim Minority in Myanmar?][permanent dead link]
- ^ 729,000 (United Nations estimate 2009)
- ^ "Myanmar Rohingya refugees call for Suu Kyi's help". Agence France-Presse. June 13, 2012. 2014-01-31 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 July 2012 रोजी पाहिले.
- ^ कराचीतील बेघर - Outlook India
- ^ SRI On-Site Action Alert: Rohingya Refugees of Burma and UNHCR’s repatriation program - Burma Library
- ^ From South to South: Refugees as Migrants: The Rohingya in Pakistan
- ^ Husain, Irfan (30 July 2012). "Karma and killings in Myanmar". Dawn. 10 August 2012 रोजी पाहिले.
- ^ Flores, Jamil Maidan (July 16, 2012). "The Lady's Dilemma Over Myanmar's Rohingya". Jakarta Globe. 17 July 2012 रोजी पाहिले.
- ^ "Myanmar, Bangladesh leaders 'to discuss Rohingya'". AFP. 2012-06-29. 2012-07-18 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2012-08-11 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन- Khin Maung Saw (1993). "Khin Maung Saw on Rohingya" (PDF). 2016-03-05 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2012-08-11 रोजी पाहिले. Unknown parameter
|month=
ignored (सहाय्य); Cite journal requires|journal=
(सहाय्य)CS1 maint: ref=harv (link) - साचा:Cite conference
- Aye Chan (2005). "The Development of a Muslim Enclave in Arakan (Rakhine) State of Burma (Myanmar)" (PDF). SOAS. 2013-07-12 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. November 1, 2011 रोजी पाहिले.CS1 maint: ref=harv (link)