सन १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या संकटावर मात करून लोकांच्या हातांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी ही योजना आकारास आणली. रोजगार हमी योजनाची पायाभरणी वसंतराव नाईक यांनी केले, त्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनाचे जनक मानले जाते. रोजगार नसलेल्यांसाठी वर्षातले किमान ठराविक दिवस रोजगाराची हमी देणारी ही योजना रोजगार हमी योजना म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आणि प्रभावीपणे चालविलेल्या योजनांपैकी ही एक योजना आहे. या योजनेसाठी नोंदणी केलेल्यांना वर्षात एक ठराविक दिवस रोजगारासाठी कामे दिली जातात. त्याबदल्यात रोख रक्कम आणि अन्नधान्य अशा स्वरूपात रोजगार दिला जातो.

अलिकडेच, याच धर्तीवर भारताच्या केंद्रसरकारने सर्व देशासाठी महाराष्ट्रात पायाभरणी झालेल्या या योजनेला केंद्र स्तरावर स्विकारून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (एनआरईजीए) करून तो पूर्ण देशासाठी तो लागू केला. महाराष्टातील 15 कलमी कार्यक्रमाअन्वये 28 मार्च 1972 ला ही योजना सुरू करण्यात आली.वरील योजनेला पाठबळ देण्यासाठी 1977 मध्ये राज्याने ' महाराष्ट्र रोजगार हमी योजना कायदा 1977' संमत केला.