रॉकी (इंग्लिश चित्रपट)

Rocky (es); Rocky (ms); Роки (bg); Rocky (tr); 洛奇 (zh-hk); Rocky (sv); Роккі (uk); 洛基 (zh-hant); 洛奇 (zh-cn); Rocky-1 (uz); Рокки (kk); Rocky (eo); Rocky (cs); Rocky (bs); রকি (bn); Rocky (fr); Rocky (hr); रॉकी (इंग्लिश चित्रपट) (mr); Rocky (vi); Rokijs (lv); Роки (sr); 石敢当 (zh-sg); Rocky (nb); Rokki (az); Rocky (en); روكي (ar); 洛奇 (yue); Rocky (hu); Rocky (eu); Rocky (ast); Rocky (ca); Rocky (de); Rocky (ga); Ռոկկի (hy); 洛奇 (zh); Rocky (fy); ロッキー (ja); روكى (arz); רוקי (he); रॉकी (hi); 洛奇 (wuu); Rocky (fi); ராக்கி (ta); Rocky (it); Rocky (et); 洛奇 (zh-hans); Рокки (ru); Rocky (nl); Роки (sr-ec); 洛基 (zh-tw); Rocky (pt); Roki (sr-el); Rocky (nds); Роки (mk); Рокки (ky); Rokis (lt); Rocky (sl); Rocky (sco); ร็อคกี้ ราชากำปั้น ทุบสังเวียน (th); Rocky (id); Rocky (pelikula) (ceb); Rocky (pl); Rocky (cy); Rocky (sh); Рокі (be); راکی (fa); Rocky (da); Rocky (ro); Rocky (gl); 록키 (ko); Ρόκυ (el); راکی (azb) película de 1976 dirigida por John G. Avildsen (es); 1976-os akció-filmdráma, melyet Sylvester Stallone forgatókönyve alapján John G. Avildsen rendezett (hu); film (sq); pel·lícula de John G. Avildsen (ca); фильм 1976 года (ru); 1976 film directed by John Avildsen (en); Film von John G. Avildsen (1976) (de); Drama esportivo americano de 1976, de John G. Avildsen, estrelado por Sylvester Stallone (pt); мастацкі фільм 1976 года (be); فیلمی از جان جی. آویلدسن (fa); 1976年上映的一部电影 (zh); амерички боксерски филм из 1976. режисера Џона Авилдсена (sr); 1976 yapımı Amerikan filmi (tr); 1976年公開のアメリカ映画 (ja); ffilm ddrama llawn cyffro gan John G. Avildsen a gyhoeddwyd yn 1976 (cy); فيلم 1976 (arz); amerikansk boxningsfilm från 1976 regisserad av John Avildsen (sv); John G. Avildsenin ohjaama urheiludraamaelokuva vuodelta 1976 (fi); סרט משנת 1976 (he); film uit 1976 van John Avildsen (nl); 1976年的電影 (zh-hant); film del 1976 diretto da John G. Avildsen (it); film réalisé par John Avildsen et sorti en 1976 (fr); 1976년 영화 (ko); 1976 film directed by John Avildsen (en); فيلم أُصدر سنة 1976، من إخراج جون أفليدسن (ar); американски боксерски филм од 1976 година (mk); film Johna G. Avildsena iz 1976. (bs) Rocky I, Rocky 1 (es); 洛奇, 洛基 (zh-sg); ร็อคกี้ (th); רוקי בלבואה (he); Roki (sh); Rocky I (sv); 龙拳虎威, 洛基, 洛奇1 (zh); Rocky I, Rocky – Die Chance seines Lebens, Rocky - Die Chance seines Lebens (de); 록키 1 (ko); Rocky, um Lutador, Rocky - um lutador, Rocky, o lutador (pt); روكي 1 (ar); Ρόκι: Τα χρυσά Γάντια (el); Rocky I (da)

रॉकी हा १९७६ मधील अमेरिकन क्रीडापट (स्पोर्ट्स ड्रामा) आहे. हा चित्रपट जॉन जी. एविल्डसेन दिग्दर्शित केला आहे तर सिल्वेस्टर स्टॅलोन यांनी लिहिलेला आहे. रॉकी चित्रपट मालिकेतील हा पहिला भाग आहे आणि यात टालिया शायर, बर्ट यंग, कार्ल वेदर्स, आणि बर्गेस मेरेडिथ हे कलाकार आहेत. चित्रपटात रॉकी बाल्बोआ (स्टॅलोन) हा एक अशिक्षित, अर्धवेळ क्लब फायटर आणि कर्ज गोळा करणारा नायक आहे, ज्याला अपोलो क्रीडद्वारे आयोजित जागतिक हेवीवेट चॅम्पियनशिपमध्ये संधी मिळते.

रॉकी (इंग्लिश चित्रपट) 
1976 film directed by John Avildsen
 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
ह्याचा भागNational Film Registry (इ.स. २००६ – )
गट-प्रकार
मूळ देश
संगीतकार
  • Bill Conti
पटकथा
निर्माता
  • Robert Chartoff
  • Irwin Winkler
वितरण
  • video on demand
दिग्दर्शक
  • John G. Avildsen
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • नोव्हेंबर २१, इ.स. १९७६ (अमेरिकेची संयुक्त संस्थाने)
  • एप्रिल २५, इ.स. १९७८ (स्वीडन)
  • एप्रिल १, इ.स. १९७७ (जर्मनी)
  • इ.स. १९७६
मालिका
  • Rocky (Rocky II, 1)
कालावधी
  • ११९ min
मूल्य
  • १०,००,००० अमेरिकन डॉलर
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

स्टॅलोनने तीन दिवसांत पटकथा लिहिल्यानंतर रॉकीचे मार्च १९७५ मध्ये काम सुरू झाले. स्टॅलोनने मुख्य भूमिकेत त्याच्याशिवाय चित्रपट बनवण्यास नकार दिल्यानंतर हा चित्रपट गुंतागुंतीच्या निर्मिती प्रक्रियेत शिरला; युनायटेड आर्टिस्ट्स या निर्मिती संस्थेने अखेरीस स्टॅलोनला चित्रपटाच्या हक्कांसाठी सहा आकड्यांचा करार नाकारल्यानंतर भूमिका देण्यास सहमती दर्शविली. जानेवारी १९७६ मध्ये मुख्य छायाचित्रणाची सुरुवात झाली; चित्रीकरण प्रामुख्याने फिलाडेल्फियामध्ये होते. या चित्रपटात दाखवलेली अनेक ठिकाणे, जसे की रॉकी स्टेप्स या आता सांस्कृतिक खुणा मानल्या जातात. [] अंदाजे $१ दशलक्षपेक्षा कमी उत्पादन खर्च असूनही रॉकी खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला.

२१ नोव्हेंबर १९७६ रोजी न्यू यॉर्क शहरात रॉकीचे प्रमुख प्रदर्शन झाले आणि ३ डिसेंबर रोजी युनायटेड आर्टिस्ट्सद्वारे अमेरिकेत चित्रपटगृहांत प्रदर्शन झाले. रॉकी हा १९७६ चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला, ज्याने जगभरात अंदाजे $२२५ दशलक्ष कमाई केली. स्टॅलोनचे लेखन, अभिनय आणि कथेबद्दल या चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली; इतर पुरस्कारांमध्ये चित्रपटाला दहा अकादमी पुरस्कार नामांकने मिळाली आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासह तीन पुरस्कार जिंकले.

अनेक प्रकाशनांनी या चित्रपटाला आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून स्थान दिले. तसेच हा चित्रपट आतापर्यंत बनवलेल्या सर्वात प्रतिष्ठित क्रीडा चित्रपटांपैकी एक आहे. रॉकी आणि त्याचे मध्यवर्ती गीत हा पॉप-सांस्कृतिक आविष्कार बनला आहे. १९७० च्या दशकातील अमेरिकन लोकप्रिय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग झालेल्या रॉकीने अनेक चित्रपट मालिका, व्हिडिओ गेम आणि व्यवसायिक उत्पादनांची मालिका तयार केली.

२००६ मध्ये, लायब्ररी ऑफ काँग्रेसने "सांस्कृतिक, ऐतिहासिक किंवा सौंदर्यदृष्ट्या महत्त्वपूर्ण" म्हणून युनायटेड स्टेट्स नॅशनल फिल्म रजिस्ट्रीमध्ये जतन करण्यासाठी रॉकीची निवड केली. [] []

संदर्भ

संपादन
  1. ^ "Rocky". TCM database. Turner Classic Movies. March 11, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 27, 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "Librarian Adds 25 Titles to Film Preservation List: National Film Registry 2006". Library of Congress.gov. September 10, 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 11, 2010 रोजी पाहिले.
  3. ^ "Rocky, Fargo join National Film Registry". Reuters. 2006-12-28. February 7, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 11, 2010 रोजी पाहिले.