रेवा नातू

हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका

डॉ.रेवा नातू या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिका आहेत.

रेवा नातू
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
वांशिकत्व हिंदू
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव पुणे
देश भारत
भाषा मराठी भाषा
पारिवारिक माहिती
वडील पं.विनायक फाटक
संगीत साधना
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, नाट्यगीत,
घराणे ग्वाल्हेर घराणे
संगीत कारकीर्द
पेशा गायकी
बाह्य दुवे
संकेतस्थळ

शिक्षण संपादन

नातू यांना संगीताचा वारसा घरातूनच लाभला आहे. त्यांचे वडील प्रसिद्ध तबलावादक पंडित विनायक फाटक यांनी त्यांना शास्त्रीय संगीताची ओळख करून दिली. पं. फाटक साथ संगत करत असलेल्या अनेक शास्त्रीय गायकांच्या मैफली नातू यांना लहानपणीच ऐकता आल्या.
वयाच्या बाराव्या वर्षी ग्वाल्हेर घराण्याचे गायक दत्तोपंत आगाशेबुवा यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे घेण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी पंडित शरद गोखले आणि डॉ. दिग्विजय वैद्य यांच्याकडूनसुद्धा शिक्षण घेतले. त्यांनी एस.एन.डी.टी. विद्यापीठ पुणे येथून संगीतातील पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तेथे त्यांना वीणा सहस्रबुद्धे यांचे मार्गदर्शन लाभले. त्या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त गायिका आहेत. त्यांनी डॉ. दिग्विजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.चा प्रबंध पूर्ण करून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीताचार्य ही पदवी मिळवली.[१]

मैफली संपादन

भारतात आणि भारताबाहेर अनेक ठिकाणी त्यांनी मैफली सादर केल्या आहेत.

शैक्षणिक क्षेत्रात योगदान संपादन

लहान मुलांना गुरू-शिष्य परंपरेच्या माध्यमातून त्या शास्त्रीय गायन शिकवतात. तसेच भारती विद्यापीठ, पुणे यांच्या संगीत विद्यालयात त्या गुरू म्हणून मार्गदर्शन करतात.

पुरस्कार संपादन

  • ललित कला प्रबोधिनीचा 'सूरश्री' पुरस्कार
  • सूरश्री फाउंडेशनचा 'स्वरभास्कर पुरस्कार' २०१६
  • सुधीर फडके युवोन्मेष पुरस्कार २०१५[३]
  • संगीताचार्य परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवल्याबद्दल अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे नऊ पुरस्कार
  • गानवर्धन, पुणे यांची ताम्हनकर शिष्यवृत्ती
  • कै.पं.त्रिंबकराव जानोरीकर पुरस्कार, २००४
  • ललकार पुरस्कार, २०११

संदर्भ संपादन

रेवा नातू यांचे अधिकृत संकेतस्थळ [४]

  1. ^ "रेवा नातू यांना 'संगीताचार्य' पदवी". Loksatta. 2014-05-04. 2018-08-08 रोजी पाहिले.
  2. ^ "सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात -Maharashtra Times". Maharashtra Times. 2013-12-13. 2018-08-08 रोजी पाहिले.
  3. ^ "इंद्रधनू रंगोत्सवात बहुभाषिक नजराणा -Maharashtra Times". Maharashtra Times. 2015-11-27. 2018-08-08 रोजी पाहिले.
  4. ^ [१]

हे सुद्धा पहा संपादन

रेवा नातू यांनी गायलेला राग मधुकंस [२]

रेवा नातू यांनी गायलेले नाट्यगीत [३]