रेल चाक कारखाना (इंग्लिश: Rail Wheel Factory) हा भारतीय रेल्वेचा एक कारखाना आहे. बंगळूरच्या येळहंका भागात स्थित असलेल्या ह्या कारखान्यामध्ये रेल्वेच्या इंजिन, प्रवासी तसेच मालवाहतूक डबे इत्यादींमध्ये वापरात येणारी सर्व प्रकारची चाके, आस (Axle) व निगडीत भाग बनवण्यात येतात.

१९७० च्या दशकाअखेरीस भारतीय रेल्वे आवश्यक असलेल्या चाकांपैकी ५५ टक्के चाके आयात करीत असे. भारतीय कंपन्यांपैकी केवळ टाटा लोह व स्टील कंपनी व दुर्गापूर स्टील कारखाना ह्या दोनच कंपन्या रेल्वेची चाके बनवीत असत. महागड्या आयत दरामुळे नुकसान होत असल्यामुळे भारत सरकारने स्वतःचा चाक कारखाना उघडण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी १५ सप्टेंबर १९८४ रोजी रेल चाक कारखान्याचे उद्घाटन केले.

बाह्य दुवे संपादन

गुणक: 13°06′05″N 77°35′15″E / 13.10149°N 77.58755°E / 13.10149; 77.58755