रेन्या मुतागुची
जपानी लष्करी अधिकारी
लेफ्टनंट जनरल रेन्या मुतागुची (जपानी:牟田口 廉也; ७ ऑक्टोबर, इ.स. १८८८:सागा प्रभाग, जपान - २ ऑगस्ट, इ.स. १९६६:तोक्यो, जपान) हा शाही जपानी सैन्यातील अधिकारी होता. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानने म्यानमारमार्गे भारतावर केलेल्या आक्रमणातील हा एक मुख्य अधिकारी होता. या मोहीमेत जपानचा पराभव होत असताना त्याच्या हाताखालील अधिकाऱ्यांनी माघार घेण्याची परवानगी मागितली असता त्याने तिघांना ताबडतोब पदनिवृत्त केले आणि मोहीम चालूच ठेवली. मुतागुचीच्या अधिकारातील ६५,००० सैनिकांपैकी ५०,०००० सैनिक या मोहीमेत मृत्युमुखी पडले. यातील अधिकांश उपासमार आणि रोगराईने मेले. जपानचा सपशेल पराभव झाला असता मुतागुचीला स्वतःलाच पदनिवृत्त केले गेले. दोस्त राष्ट्रांनी त्याला युद्धगुन्हेगार ठरवून त्यास तुरुंगात पाठवले होते.
जपानी लष्करी अधिकारी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | 牟田口廉也 | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | ऑक्टोबर ७, इ.स. १८८८ सागा प्रांत | ||
मृत्यू तारीख | ऑगस्ट २, इ.स. १९६६ टोकियो | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
| |||