रेनिये तिसरा (रेनिये लुई हेन्री मॅक्सन्स बर्ट्रांड ग्रिमाल्डी; ३१ मे, १९२३ - ६ एप्रिल, २००५) हा १९४९ ते २००५ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत मोनॅकोचा राजकुमार होता. रेनियेने जवळजवळ ५६ वर्षे मोनॅकोच्या रियासतीवर राज्य केले.

रेनियेने १९५६ मध्ये अमेरिकन चित्रपट अभिनेत्री ग्रेस केलीशी लग्न केले. याची जगभर चर्चा झाली होती. त्यांना कॅरोलिन, अल्बर्ट आणि स्टेफनी अशी तीन मुले होती.

रेनिये तिसरा आणि राजकुमारी ग्रेस मे 1961 मध्ये व्हाईट हाऊसमध्ये जेवणासाठी आले.
१९६६ मध्ये रैनिये कुटुंब

संदर्भ

संपादन