रेंटेनमार्क
रेंटेनमार्क हे जर्मनीचे चलन होते. हे १९२३ मध्ये चलनात आले व १९२४मध्ये राइक्समार्क चलनात येईपर्यंत रेंटेनमार्क हे जर्मनीचे एकमेव अधिकृत चलन होते. रेंटेनमार्क १९४८पर्यंत स्वीकारले जायचे.
१९२३ च्या सुरुवातीस जर्मनीतील आर्थिक व्यवस्थेवरील संकटामुळे तेथील सरकारने त्यावेळचे चलन असलेले पेपियेरमार्क अमाप प्रमाणात छापले. याने अतिचलनवाढ झाल्यावर त्याला आळा घालण्यासाठी १५ ऑक्टोबर, १९२३ रोजी रेंटेनमार्क चलनात आणले गेले व २० नोव्हेंबर रोजी पेपियेरमार्क रद्द करून फक्त रेंटेनमार्क चलनात ठेवले.
१ रेंटेनमार्कची सुरुवातीची किंमत १०,००,००,००,००,००० (१ हजार अब्ज किंवा १० निखर्व) पेपियेरमार्क होती.