रूर नदी

(रुह्र नदी या पानावरून पुनर्निर्देशित)

रूर नदी तथा रुह्र नदी जर्मनीच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील नदी आहे. ही नदी विंटरबर्ग जवळ उगम पावून आधी वायव्येकडे व नंतर पूर्वेकडे वाहत ऱ्हाइन नदीला मिळते. ही नदी २१९ किमी लांबीची असून उगमापासून संगमापर्यंत २,२०० फूट उंचीवरून ५६ फूटावर येते.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस रूर नदीचे खोरे जर्मनीचा महत्त्वाचा औद्योगिक प्रदेश होता. येथे मुबलक प्रमाणात खनिजे असून मोठी ओद्योगिक केंद्रे येथे होती. पहिल्या महायुद्धानंतर वायमार प्रजासत्ताकाने दोस्त राष्ट्रांना खंडणी न दिल्यामुळे फ्रेंचानी या भागाचा ताबा घेतला. यामुळे येथील उद्योगांमध्ये संप होउन ते बंद पडले. याचा जर्मनीच्या आर्थिक अडचणींना मोठा हातभार लागला व त्याचे पर्यवसान दुसऱ्या महायुद्धात झाले.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश वायुसेनेने एका धाडसी मोहीमेत या भागातील मॉहने आणि सोर्पे धरणांवर हल्ला चढवून ही फोडली होती. त्यामुळे आलेल्या पुरात अंदाजे १,७०० व्यक्ति मृत्यू पावले होते.[] जर्मनीने अटलांटिक भिंतीवर काम करणारे बिगारी कामगार येथे आणून ही धरणे काही महिन्यांतच दुरुस्त केली होती.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "1943: RAF raid smashes German dams". BBC. 1943-05-17. 2007-05-17 रोजी पाहिले.