रुपेरी पाँफ्रेट
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
ओळख
संपादनरुपेरी पॉंफ्रेट याचे मराठी नाव चांदवा आहे. भारतापासून मलाया द्वीपकल्पापर्यंतच्या आणि त्याच्याही पलीकडच्या समुद्रात हे मासे सापडतात. यांची लांबी सु. ३० सेंमी. पर्यंत असते. प्रौढ माशाचे वजन सु. १ किग्रॅ. असते. डोक्याची व शेपटीची लांबी शरीराच्या लांबीच्या सु. १/४ असते. डोके व पाठ (पार्श्र्व रेखेपर्यंत) करड्या रंगाची असून त्यात जांभळ्या रंगाची झाक असते. डोक्याच्या आणि शरीराच्या दोन्ही बाजू रुपेरी करड्या असून पोटाकडची बाजू पांढरी असते. सगळ्या शरीरावर बारीक काळे ठिपके असतात. प्रच्छदाच्या (कल्लयावरील झाकणाच्या) वरच्या भागावर काळा ठिपका असतो. शेपटीचा भाग पिवळसर पांढरा असतो. कनीनिका (मध्यभागी छिद्र असलेले डोळ्यातील रंगयुक्त पटल) रुपेरी असते
वर्णन
संपादनशरीर दोन्ही बाजूंनी दबलेले असते. पृष्ठपक्ष आणि गुदपक्ष (पाठीवरील व गुदाजवळील पर) करड्या रंगाचे असून त्यांवर दाट काळे ठिपके असतात. या दोन्ही पक्षांतील कंटक (काटे) छाटल्यासारखे दिसतात. पुच्छपक्ष (शेपटीचा पर) खोल भेगेने द्विशाखित झालेला असून त्याची खालची पाली जास्त लांब असते. सगळे शरीर लहान, पातळ शल्कांनी (खवल्यांनी) आच्छादिलेले असून ते झडणारे असतात.
या माशांचे मांस लुसलुशीत आणि स्वादिष्ट असल्यामुळे त्यांचा खाण्याकरिता बराच उपयोग करतात. यामुळे यांची मासेमारी फार मोठ्या प्रमाणावर चालते.मुंबई किनाऱ्यावर यांच्या मासेमारीचा हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होतो व नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात तो तेजीत असतो. या अवधीत हे मासे फार मोठ्या प्रमाणावर पकडले जातात. फेब्रुवारीनंतर यांचे थवे स्थलांतर करून दक्षिणेकडे जातात. मार्च आणि एप्रिल महिन्यांत दक्षिण कारवारच्या किनाऱ्यावर ते मुबलक असतात. यानंतर ते मलबार किनाऱ्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत विपुल असतात. अशाच प्रकारचे या माशांचे स्थलांतर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर होत असल्याचे दिसून येते.