रीमा साठे (५ सप्टेंबर, १९८३)[१] या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आणि उद्योजिका आहेत. त्यांनी एक अन्नधान्याची कंपनी स्थापन केली तसेच या कंपनीचा नफा त्या लहान शेतकऱ्यांसोबत अधिक न्याय्यपणे वाटप करते. इ.स. २०१७ मध्ये त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

रीमा अशोक साठे
जन्म ५ सप्टेंबर, १९८३ (1983-09-05) (वय: ४०)
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा समाजसेविका, उद्योजिका
मालक हॅपी रुट्स फूड्स बिवरेजेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
पदवी हुद्दा संचालिका
पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार

इ.स. २०१८ मध्ये साठे यांना फोर्ब्स मासिकाने आणि २०१९ मध्ये 'जागतिक बँकेने' आणि 'संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम' द्वारे वैशिष्ट्यीकृत केले गेले.

वैयक्तिक जीवन संपादन

साठे या रासायनिक अभियंता (केमिकल इंजिनीअर) मध्ये पदवीधर आहेत.[२]

अन्न आणि पेय उद्योगात सात वर्षे काम केल्यानंतर साठे यांनी ‘हॅपी रूट्स’ हा सामाजिक उपक्रम सुरू केला.[३] इ.स. २०१४ मध्ये साठे यांनी आपली नोकरी सोडून स्वयंरोजगाराची निर्मिती केली.[४] साठे यांना "कृषी स्टार"[३] नावाच्या नवीन कंपनीसाठी विपणन, महाव्यवस्थापक म्हणून काम करत असताना, लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या, विशेषतः महिलांसमोरील आव्हानांनी खूप व्यथित केले.[२]

साठे यांनी देशी तृणधान्ये, धान्ये आणि विविध प्रकारचे देशी पशुधन यावर लक्ष केंद्रित करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शेत-ते-मार्केट पुरवठा साखळी तयार केली आहे, ज्यामुळे भारतातील चार राज्यांमधील ३०,००० पेक्षा जास्त लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. त्यांच्या कंपनीने शेतकऱ्यांना नेहमीच्या बाजारभावापेक्षा ५०% जास्त भाव देऊन उच्च दर्जाचे, देशी धान्य उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले आणि या धान्यांपासून आरोग्यदायी, पौष्टिक फराळाचे अन्न तयार केले जे शहरी ग्राहकांना चांगलेच आवडले. अहमदनगरमधील महिला शेतकऱ्यांनी साठे यांच्या व्यवसायासाठी कुट्टू (buckwheat)चे उत्पादन करून आपले उत्पन्न तिपटीने वाढवले.[५] तिच्या उत्पादनांच्या श्रेणीमध्ये गहू, कुट्टू, राजगिरा, अंबाडीचे बियाणे आणि बार्लीपासून बनविलेले चटपटीत खाद्यपदार्थ आणि कुकीज यांचा समावेश आहे.[६]

साठे यांनी जुलै २०२० मध्ये 'सेरेनी मेडोज' येथे लहान बदलांच्या सामर्थ्यावर टेडेक्स भाषण दिले.[७]

पुरस्कार संपादन

  • साठे यांना २०१७ मध्ये बिझनेस टुडेच्या 'सर्वात शक्तिशाली महिला' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[६]
  • 'शी द पीपल्स फेसबुक, गूगल, द्वारे २०१७चा 'डिजिटल महिला पुरस्कार' दिला गेला.
  • साठे यांना २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात इ.स. २०१६चा नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यावर्षीच्या पुरस्कार मिळालेल्या पाच संस्था आणि २७ महिलांपैकी त्या एक होत्या.[४][८]

संदर्भ संपादन

  1. ^ "Reema Ashok Sathe" (इंग्रजी भाषेत).
  2. ^ a b "This Chemical Engineer Read One Story on 'The Better India' and Is Helping 10,000 Farmers Now". The Better India (इंग्रजी भाषेत). 2016-10-21. 2021-02-24 रोजी पाहिले.
  3. ^ a b "That Happy Feeling- Business News". www.businesstoday.in. 2021-02-24 रोजी पाहिले.
  4. ^ a b admin. "Five Ngo's, 27 Women given Nari Shakti Award" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2021-09-26. 2021-02-24 रोजी पाहिले.
  5. ^ "That Happy Feeling". Business Today (इंग्रजी भाषेत). 2021-07-29 रोजी पाहिले.
  6. ^ a b World, Editorial Brewer (2018-07-31). "Commercialising the Grain » Brewer World-Everything about beer is here". Brewer World-Everything about beer is here (इंग्रजी भाषेत). 2021-07-29 रोजी पाहिले.
  7. ^ The power of small changes | Reema Sathe | TEDxSereneMeadows (इंग्रजी भाषेत), 2021-07-29 रोजी पाहिले
  8. ^ "Nari Shakti Awardees- Ms. Reema Sathe, Maharashtra | Ministry of Women & Child Development". wcd.nic.in. 2021-07-29 रोजी पाहिले.