रिटा वर्मा
भारतीय राजकारणी
रिटा वर्मा (जन्म १५ जुलै १९५३, पाटणा) या भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत.[१] त्या भारत सरकारमधील माजी खाण आणि खनिज राज्यमंत्री आहेत. त्या एसएसएलएनटी वुमेन्स कॉलेज, धनबाद येथील इतिहासाच्या प्राध्यापक आहे.[२]
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै १५, इ.स. १९५३ पाटणा | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
| |||
वर्मा यांनी पाटणा विद्यापीठात शिक्षण घेतले आणि रांची विद्यापीठात त्या इतिहास शिकवत होत्या. १९९१ मध्ये बिहारमधील धनबाद मतदारसंघातून त्या १०व्या लोकसभेवर निवडून आल्या होत्या. १९९६, १९९८ आणि १९९९ मध्ये त्याच मतदारसंघातून त्या पुन्हा लोकसभेवर निवडून आल्या. त्यांचे पती रणधीर प्रसाद वर्मा होते, जे १९७४ च्या बिहार कॅडरचे आईपीएस होते. त्यांनी धनबाद येथे बँक लुटण्याचा प्रयत्न अयशस्वी करताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले जेथे ते पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.[३]
पदे भूषवली
संपादन- १९९९-२०००: खाण आणि खनिज राज्यमंत्री
- २०००: आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री
- २०००-०१: ग्रामीण विकास राज्यमंत्री
- २००१-०३: मानव संसाधन विकास राज्यमंत्री
संदर्भ
संपादन- ^ "Members : Lok Sabha". loksabhaph.nic.in. 2021-10-22 रोजी पाहिले.
- ^ "Biographical sketch on the Parliament of India's website". 1 June 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ चौबे, प्रदूमन (३ जानेवारी २०२१). "Chowk revamp as tribute to ex-Dhanbad SP". २ मार्च २०२३ रोजी पाहिले.