रामराव कृष्णराव पाटील

(रा.कृ. पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)

रामराव कृष्णराव पाटील यांचा जन्म १३ डिसेंबर इ. स. १९०७ रोजी एका श्रीमंत जमीनदार कुटुंबात झाला. स्वातंत्र्य लढ्यासाठी आयसीएस सेवेचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये रा.कृ.पाटील एक होते.

रामराव कृष्णराव पाटील
जन्म राम
१३ डिसेंबर इ. स. १९०७
मृत्यू १ जून २००७
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
वडील कृष्णराव


इ. स. १९२६ मध्ये रा.कृ.पाटील यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बीएस्‌सी केले. नागपूर विद्यापीठातून एलएल्‌बी केल्यानंतर इ. स. १९३० मध्ये त्यांनी इंग्लंडमधून बॅरिस्टरची पदवी मिळवली. त्यानंतर ते मध्य प्रांताचे कलेक्टर म्हणून रुजू झाले होते.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी आय.सी.एस. सेवेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी मध्य प्रांतात आमदार म्हणून काम केले होते. तसेच विविध खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. ते जवाहरलाल नेहरूंनी स्थापन केलेल्या पहिल्या प्लॅनिंग कमिशनचे सदस्य होते. ऐतिहासिक नागपूर करारावर त्यांनी सही केली होती. त्यांनी स्वतःला सक्रिय राजकारणातून निवृत्त होऊन समाजसेवेला वाहून घेतले होते.

त्यांचे वयाच्या ९९व्या वर्षी, ३१ मे, २००७ रोजी निधन झाले. त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला.