रघुनाथ रामचंद्र किणीकर

(राॅय किणीकर या पानावरून पुनर्निर्देशित)

रघुनाथ रामचंद्र किणीकर तथा रॉय किणीकर (इ.स. १९०७ - ५ सप्टेंबर, इ.स. १९७८) हे मराठी भाषेतील कवी, नाटककार, पत्रकार होते. त्यांचे वडील वकील होते. रॉय किणीकरांनी आयुष्यातील बहुतांश काल कर्नाटकातील गुलबर्गा येथे घालवला. पुढचा काही काळ त्यांनी पुण्यात आणि औरंगाबादेत व्यतीत केला.

रघुनाथ रामचंद्र किणीकर
जन्म नाव रघुनाथ रामचंद्र किणीकर
टोपणनाव रॉय किणीकर
जन्म इ.स. १९०७
मृत्यू ५ सप्टेंबर, इ.स. १९७८
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता, अभिनय
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, नाटक, कथा, कादंबरी

रॉय किणीकर हे औरंगाबाद येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक अजिंठाच्या रविवारच्या आवृत्तीचे संपादक होते. रविवार पुरवणीत ते काहीना काही ललित लेखन करीत असत.

रॉय किणीकर यांनी काही नाटकांत भूमिका केल्या आहेत. औरंगाबाद येथील सरस्वती भुवन शाळेच्या मदतीसाठी झालेल्या आचार्य अत्रे यांच्या ’घराबाहेर’ नाटकात त्यांनी काम केले होते. त्यांनी औरंगाबाद नभोवाणीसाठी काही श्रुतिकाही लिहिल्या होत्या. त्यांच्या नाटकांचे रंगभूमीवर प्रयोग होत असत. रॉय किणीकरांच्या ’ये गं ये गं विठाबाई’ या नाटकाचे त्याकाळी १९ प्रयोग मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या नाट्य विभागाने केले होते. साहाय्यक नाट्यदिग्दर्शक म्हणून ते अभिनय, संवादफेक अशा गोष्टी सहजपणे समजावून सांगत.


प्रकाशित साहित्य

संपादन

किणीकरांनी नाटक, एकांकिका, कथा, कादंबरी, अनुवाद, बालसाहित्य अशा साहित्याच्या बहुतेक प्रत्येक क्षेत्रात लिखाण केले असले तरी रात्र आणि प्रामुख्याने उत्तररात्र ह्या दोन कवितासंग्रहांच्या माध्यमातून रॉय किणीकर हे जाणकारांना जास्त परिचीत आहेत. रॉय किणीकर हे त्यांच्या शैलीबद्ध "रुबायांसाठी" ओळखले जात.

नाव साहित्यप्रकार प्रकाशक / प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.) टिप्पणी
अँड नाउ मिगेल सहलेखक Joseph Krumgold
आंधळे रंग, पांगळ्या रेषा कथासंग्रह
इथे जगण्याची सक्ती आहे अनुवादित
उत्तररात्र कवितासंग्रह चार ओळींच्या रुबाईवजा रचनांचे पुस्तक
एकदाच अशी रात्र येते अनुवादित नाटक
किती रंगला खेळ नाटक
कोनार्क कादंबरी
खजिन्याची विहीर नाटक
गांधी नावाचे महात्मा चरित्र
दर्यावर्दी कोलंबस अनुवादित
देव्हारा एकांकिका
फुलराणी बालसाहित्य
मंगळसूत्र नाटक
ये गं ये गं विठाबाई नाटक
रम्य ते बालपण अनुवादित
रात्र कवितासंग्रह
शिल्पायन निबंधसंग्रह मनोविकास प्रकाशन इ.स. २०१३
साऊंड ट्रॅक एकांकिका

रॉय किणीकर यांना मिळालेले पुरस्कार

संपादन
  • ’ये गं ये गं विठाबाई’ या नाटकाला महाराष्ट्र सरकारचे १९६३ सालचे लेखन पारितोषिक.

रॉय किणीकर यांच्याविषयीची पुस्तके

संपादन
  • रॉय किणीकर माणूस आणि साहित्य (लेखक अनिल किणीकर)

बाह्य दुवे

संपादन