राहुल देशपांडे (१० ऑक्टोबर, इ.स. १९७९; पुणे, महाराष्ट्र - हयात) लोकप्रिय हिंदुस्तानी संगीतातील गायक आहेत. त्यांनी सुरू केलेला वसंतोत्सव हा भारतातील एक मोठा संगीतोत्सव समजला जातो. हिंदुस्तानी संगीतातील गायक वसंतराव देशपांडे त्यांचे आजोबा होते. त्यांनी हिंदुस्तानी शैलीतील गायनाचे प्रशिक्षण उषा चिपलकट्टी, मुकुल शिवपुत्र, गंगाधरबुवा पिंपळखरे, मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे घेतले.

राहुल देशपांडे

राहुल देशपांडे गायन करताना (मार्च, २०११)
आयुष्य
जन्म १० ऑक्टोबर, इ.स. १९७९
जन्म स्थान पुणे, महाराष्ट्र,भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
जोडीदार नेहा देशपांडे
अपत्ये रेणुका देशपांडे
संगीत साधना
गुरू उषा चिपलकट्टी, मुकुल शिवपुत्र, गंगाधरबुवा पिंपळखरे, मधुसूदन पटवर्धन
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
नाट्यसंगीत
अभंग
संगीत कारकीर्द
पेशा गायकी व संगीतकार
कार्य संस्था वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान
गौरव
पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार विजेते
बाह्य दुवे
[www.rahuldespande.com संकेतस्थळ]

राहुल देशपांडे यांना दूरचित्रवाणीवरील सूर-ताल आणि नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमांतून अफाट प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या संगीताच्या मैफिली ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, अमेरिका आणि इंग्लंडमध्येही झाल्या आहेत.

देशपांडे यांनी संगीत मानापमान या संगीतनाटकाचे पुनरुज्जीवन केले. तसेच त्यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकामध्ये केलेले खाँसाहेब प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात.

तसेच "राहुल देशपांडे" यांनी "मी वसंतराव" हा त्यांच्या आजोबांच्या आयुष्याचा प्रवास उलगडणारा चित्रपटांमधे वसंतराव यांची भूमिका केली. त्या चित्रपटाचे संगीत देखील त्यांनी केले. हा संगीतकार म्हणून त्यांचा पहिला चित्रपट आहे परंतु त्यांनी खूप जास्त समर्पक संगीत केले आहे. त्यासाठी त्यांच्या या चित्रपटाला जवळपास "सहा" पुरस्कार मिळाले व राहुल देशपांडे यांना "राष्ट्रीय" पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुरस्कार

संपादन
  • रसिकाग्रणी दत्तोपंत देशपांडे पुरस्कार
  • सुधीर फडके पुरस्कार
  • स्वरानंद प्रतिष्ठान चा २००८सालचा माणिक वर्मा पुरस्कार

संदर्भ

संपादन