मुकुल शिवपुत्र

संगीत कलाकार

मुकुल शिवपुत्र कोमकली (२५ मार्च, इ.स. १९५६ - हयात) हे भारतातील हिंदुस्तानी संगीतातील गायक आहेत. गायक कुमार गंधर्व हे त्यांचे वडील आणि गायिका भानुमती कंस या त्यांच्या आई.

मुकुल शिवपुत्र कोमकली
आयुष्य
जन्म २५ मार्च, इ.स. १९५६
जन्म स्थान भोपाळ, मध्य प्रदेश, भारत
पारिवारिक माहिती
आई भानुमती कंस
वडील कुमार गंधर्व
संगीत साधना
गुरू कुमार गंधर्व, के.जी.गिंडे
गायन प्रकार हिंदुस्तानी गायन
घराणे ग्वाल्हेर
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र संगीत
कारकिर्दीचा काळ इ.स. १९७५ - चालू

बालपणसंपादन करा

मध्यप्रदेशातील 'देवास' या गावी मुकुल यांचा जन्म झाला. त्यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतल्यावर मुकुल शिवपुत्र यांनी वयाच्या सतराव्या वर्षी घर सोडले. त्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे यांच्याकडून धृपद-धमाराचे, तर एम. डी.रामनाथन यांच्याकडून कर्नाटक संगीताचे शिक्षण घेतले.

कारकीर्दसंपादन करा

मुकुल हे ख्याल, भक्तिसंगीत व लोकगीतांसाठी विशेष ओळखले जातात. १९७५ पासून ते शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करीत आहेत. २३ व्या सवाई गंधर्व महोत्सवापासून त्यांनी गायनाचा श्रीगणेशा केला. ते कुमार गंधर्वांचे चिरंजीव अन् शिष्य असले तरी त्यांच्या गायकीतून कोठेही कुमारजी फारसे डोकावत नाहीत. "तब्बल वीस वर्षे केवळ मंदिरांमध्ये गाणारा मुकुल जर बैठक न मोडता कार्यक्रम करत गेला असता तर आज तो त्याच्या बापाच्याही पुढे गेला असता" असे पंडित वसंतराव देशपांडे म्हणाले होते. ग्वाल्हेर घराण्याची गायकी घेऊन हे अवधूत भारतभर फिरले.

संस्कृतमध्ये केलेल्या संगीत रचना ही मुकुल शिवपुत्र यांची भारतीय शास्त्रीय संगीताला दिलेली देणगी आहे.

कुणी जाल का सांगाल कासंपादन करा

मुकुल शिवपुत्र हे एका रात्री त्यांच्या घरात गात असताना दुरून कवि अनिल यांनी त्यांचे गाणे ऐकले आणि त्यांनी 'कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का या कोकिळा?, रात्री तरी गाऊं नको, खुलवूं नको आपुला गाळा' या अजरामर गीताची रचना केली. हे गाणे वसंतराव देशपांडे, राहुल देशपांडे यांनी गायले आहे. संगीतकार यशवंत देव आहेत.

वादसंपादन करा

मुकुल त्यांच्या गाण्याइतकेच त्यांच्या विचित्र स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. मैफलींना उपस्थित न राहणे, मद्यधुंद अवस्थेत रेल्वेस्टेशन, बसस्थानक अशा ठिकाणी भीक मागणे असे अनेक प्रकार त्यांच्या बाबतीत घडले आहेत. पुण्यातील २०१० मधील वसंतोत्सवात या कारणामुळेच ते गायन करू शकले नाहीत आणि त्यामुळे रसिकांची निराशा झाली.

मुकुल शिवपुत्र हे एकाला हुशंगाबाद रेल्वे स्टेशनवर निःसंग अवस्थेत सापडले. त्यांना घेऊन तो गृहस्थ भोपाळच्या 'भारत भवन' या संगीत-नाट्य-नृत्य कला संस्थॆत घेऊन गेला. आता ते त्यांना काही काळासाठी पदधिकारी केले होते.

मुकुल शिवपुत्र यांना मिळालेले पुरस्कारसंपादन करा

  • साहित्यिक ह.मो. मराठे यांच्या हस्ते दिला गेलेला प्रतिभागौरव पुरस्कार (१५-३-२०१५)