राष्ट्र

(राष्ट्र् या पानावरून पुनर्निर्देशित)

राष्ट्र ह्या शब्दाचा ढोबळ अर्थ एका भूभागावर राहणाऱ्या व संयुक्त सरकार असणाऱ्या व्यक्तींचा मोठा समूह असा होतो.राष्ट्र या शब्दाला इंग्लिश भाषेत "नेशन" म्हणतात. नेशन या या शब्दाचे मूळ लॅटिन मधील "nasci" या शब्दात आहे. nasciचा अर्थ 'जन्माला येणे' असा आहे.म्हणूनच असे मानले जाते की एखाद्या राष्ट्राच्या लोकांमध्ये वांशिक आणि सांस्कृतिक संबंध असतात. एका राष्ट्रातील लोक साधारणपणे समान वंशाचे, वर्णाचे असतात व एकच भाषा बोलतात. बरेचदा राष्ट्र हा शब्द देश ह्याच अर्थाने वापरला जातो. भारतीय संस्कृतीमधील विविधतेचे वर्णन राष्ट्र हा शब्द वापरून करणे शक्य आहे. उदा: तमिळ राष्ट्र, मराठी राष्ट्र इत्यादी.

हे सुद्धा पहा

संपादन