राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (कर्नाटक)
राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (कर्नाटक) (संक्षिप्त NITK ) (National Institute of Technology, Karnataka) ही भारत देशाच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांपैकी एक आहे. कर्नाटकच्या मंगळूर शहरात स्थित असलेली एन.आय.टी. कर्नाटक अभियांत्रिकी, विज्ञान व मानव्यविद्या ह्या क्षेत्रांमध्ये पदवी व उच्च शिक्षणाचे कार्यक्रम चालवते.
NITK | |
Type | सार्वजनिक तांत्रिक संस्था |
---|---|
स्थापना | 1960 |
संकेतस्थळ | https://www.nitk.ac.in/ |
१९५९ ते १९६५ दरम्यान पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या १४ रीजनल इंजिनियरिंग कॉलेजांपैकी आर.ई.सी. कर्नाटक (REC Karnataka) हे एक होते. १९८० ते २००२ दरम्यान आर.ई.सी. कर्नाटक मंगळूर विद्यापीठाच्या अखत्यारीत होते. २००२ साली भारत सरकारने सर्व रीजनल इंजिनियरिंग कॉलेजांना राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांचा दर्जा दिला व ह्या कॉलेजचे नाव बदलून राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, कर्नाटक असे ठेवण्यात आले.
२०१४ सालच्या एका सर्वेक्षणानुसार एन.आय.टी. कर्नाटक भारतामधील ८वे सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालय होते.