राम सुतार (शिल्पकार)

भारतीय कलाकार
(राम सुतार या पानावरून पुनर्निर्देशित)

राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. यांचा जन्म इ.स. १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला. सुतार यांनी २००हून अधिक शिल्पे जगातील पाचही खंडांत बनवली आहेत. दिल्ली येथील संसद भवनाच्या प्रांगणात राम सुतार यांची शिल्पे आहेत.[]

इ.स. १९५२ मध्ये सर जे. जे. आर्टस कॉलेजमध्ये शिल्पकलेची पदवी मिळवली. यावेळी त्यांना मानाचे मेयो सुवर्णपदक मिळाले. इ.स. १९५४ मध्ये भारतीय पुरातत्त्व खात्यात नोकरीची सुरुवात - औरंगाबाद येथे केली. अजिंठा-वेरूळ लेण्यांमधील खराब झालेल्या शिल्पांची डागडुजी करण्याचे काम त्यांनी केले. इ.स.१९५८मध्ये त्यांनी दिल्लीला स्थलांतर केले.

पुरस्कार

संपादन
  • इ.स.१९९९ - पद्मश्री
  • इ.स.२०१०- दि बॉम्बे आर्ट सोसायटीचा रूपधर जीवनगौरव पुरस्कार

दि बॉम्बे आर्ट सोसायटीचा रूपधर जीवनगौरव पुरस्कार

◆ इ.स .2016 टागोर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार (भारत सरकार)*2018ला प्रदान करण्यात आला

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ राम सुतार. Loksatta (Marathi भाषेत). 19-11-2018 रोजी पाहिले. संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) असे पुतळे घडविले आहेत, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही अनेक पुतळे त्यांनी घडविलेले आहेत, रवीन्द्रनाथ टागोर यांचा टोकिओतील पुतळा राम सुतार यांनी निर्मिलेला आहे, तसेच गांधीजींचे त्यांच्या स्टुडिओत घडलेले अनेक अर्धपुतळे भारत सरकारने परदेशांना भेट म्हणून दिलेले आहेत. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्यदुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत