रामायणातील व्यक्तिरेखांसाठी पहा: रामलक्ष्मण

राम-लक्ष्मण (पूर्ण नाव: विजय पाटील) हा एक भारतीय संगीतकार व चित्रपट संगीत दिग्दर्शक आहे. इ.स. १९७६ पर्यंत सुरेंद्र हेंद्रे व विजय पाटील राम लक्ष्मण ह्या नावाने संगीत द्यायचे. १९७६ साली सुरेंद्र हेंद्रे निधनानंतर राम लक्ष्मण हे नाव वापरणे चालू ठेवले.

राम लक्ष्मणने बॉलिवूडमधील काही हिट चित्रपटांना संगीत दिले आहे. १९८९ मधील मैने प्यार कियाच्या संगीतासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. पत्थर के फूल, हम आपके हैं कौन..!, हम साथ साथ हैं इत्यादी काही त्याचे लोकप्रिय चित्रपट आहेत. त्याने आजवर सुमारे ७५ हिंदी. मराठी व भोजपुरी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे.