राधाकृष्ण माथूर
(राधाकृष्ण माथुर या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
राधाकृष्ण माथूर (२५ नोव्हेंबर, इ.स. १९५३) हे भारताचे मुख्य माहिती आयुक्त आहेत. डिसेंबर २०१५ साली त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला. ते यापूर्वी विशेष व अतिरिक्त संरक्षण सचिव होते.
माथूर हे मणिपूर-त्रिपुरा केडरचे १९७७ च्या तुकडीतील सनदी अधिकारी आहेत. आयआयटी कानपूर येथून बी.टेक पदवी घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली आयआयटीतून उद्योग अभियांत्रिकीत एम.टेक केले. स्लोव्हेनिया येथून त्यांनी एमबीए केले. इ.स. २००० ते २००८ या काळात त्यांनी त्रिपुरात विविध पदांवर काम करताना शेवटी त्या राज्याचे मुख्य सचिवपदही भूषवले होते. संरक्षण खात्यात सचिव होण्यापूर्वी ते लघु व मध्यम उद्योग खात्याचे सचिव झाले.
राधाकृष्ण माथूर यांना माहिती आयुक्तपदावर वयाच्या पासष्टीपर्यंत म्हणजे इ.स. २०१८पर्यंत काम करता येईल.