राणी चित्रलेखा भोसले

भारतीय समाजसेविका व राजकारणी

राणी चित्रलेखा भोसले (२६ फेब्रुवारी, १९४१:वडोदरा, गुजरात, भारत - १६ ऑगस्ट, २०१५) या भारतीय समाजसेविका आणि राजकारणी होत्या.

या महाराष्ट्रातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे बाराव्या लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.

भोसले यांनी महाराजा सयाजीराव विद्यापीठातून कलाशाखेची पदवी घेतली होती.

नागपूरच्या भोसले राजघराण्याच्या त्या स्नुषा आहेत.