राजीव खांडेकर
राजीव खांडेकर हे एक मराठी पत्रकार आहेत. २५हून अधिक वर्षे ते या व्यवसायात आहेत. महाराष्ट्रातील आघाडीच्या 'एबीपी माझा' (पूर्वाश्रमीची 'स्टार माझा’) या दूरचित्रवाणीच्या वृत्तवाहिनीचे ते मुख्य संपादक आहेत.
राजीव खांडेकर | |
---|---|
जन्म | आटपाडी, सांगली जिल्हा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | प्रसारमाध्यम संपादक |
मालक | एबीपी माझा |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
त्यांचे प्राथमिक शिक्षण आटपाडीला, काॅलेजचे सांगलीला आणि त्यापुढील पदव्युत्तर शिक्षण पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये झाले.
राजीव खांडेकर यांनी १९८९ मध्ये पुण्याच्या सकाळमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. नाशिक सकाळ आणि पुण्याच्या लोकसत्तामध्ये काही काळ काम केल्यानंतर १९९५ पासून पुढे पाच वर्षे त्यांनी लोकसत्ताचे नवी दिल्ली येथल प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. या काळातील राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रासंबंधीच्या त्यांच्या अनेक बातम्या महाराष्ट्रभर गाजल्या. २००० मध्ये ईटीव्ही मराठी सुरू झाल्यावर त्या वाहिनीच्या मुंबई ब्युरोचे प्रमुख म्हणूनही त्यांनी अडीच वर्षे काम पाहिले.
ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थकारण आणि महाराष्ट्राचे राजकारण या दोन विषयांमध्ये गती असलेले राजीव खांडेकर ‘एबीपी माझा’मध्ये रुजू होण्यापूर्वी ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक म्हणून काम करीत होते. मार्मिक राजकीय विश्लेषणाबरोबरच, खांडेकर यांनी या काळात लिहिलेला ‘हार्ट टु हार्ट’ हा कॉलमही त्यातील शैलीदार भाषेमुळे वाचकांच्या स्मरणात राहिला. त्यांच्या हार्ट टु हार्ट या पुस्तकाला नंतर उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला.
मार्मिक राजकीय विश्लेषण, संयत मांडणीची पद्धत आणि परखडपणासाठी खांडेकर ओळखले जातात. ‘एबीपी माझा’च्या उभारणीपासून अल्पावधीत महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय वृत्तवाहिनीचा मान मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
भारतीय वृत्तवाहिन्यांच्या दर्जावर अंकुश ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यूझ ब्रॉडकास्टिंग स्टॅंडर्ड ॲथॉरिटीवर त्यांची सन्माननीय नियुक्ती झाली आहे. या पदावर नियुक्ती झालेले ते पहिलेच मराठी संपादक आहेत. देशभरातील सर्वच वृत्तवाहिन्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आखून देण्याचे काम ही ॲथॉरिटी करते.
राजीव खांडेकर यांना मिळालेले पुरस्कार
संपादन- एकमत पुरस्कार
- महाराष्ट्र संपादक परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार
- सासवडच्या आचार्य अत्रे प्रतिष्ठानचा मानाचा पुरस्कार
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार
- महर्षि नारद पुरस्कार
- ‘हार्ट टु हार्ट’ पुस्तकाला उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार