हंसध्वनी

(राग हंसध्वनी या पानावरून पुनर्निर्देशित)

हंसध्वनी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. संथ जलाशयात विहार करणाऱ्या शांत हंसांचा आवाज. दक्षिणेतील कर्नाटक संगीताचे वाग्गेयकार रामस्वामी दीक्षितार यांनी ऐकला असणार आणि ‘हंसध्वनी’ या अद्‍भुत नावाचा मधुर राग जन्माला आला. पुढे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात रामस्वामींचे चिरंजीव संतकवी-संगीतज्ज्ञ मुथ्थुस्वामी दीक्षितार यांनी आपल्या वडिलांनी निर्माण केलेल्या रागात ‘वातापि गणपती भजेऽहं’ ही गणेशवंदना रचली.

पुण्याच्या ‘नवयुग स्टुडिओ’त मा. दीनानाथ मंगेशकरांची एक किशोरवयीन मुलगी लता ऑडिशन देत होती. वडलांची नाट्यगीते म्हणून दाखवीत होती. तिनं ‘हंसध्वनी’मधील बंदिश ‘लागी लगन सखी’ म्हणून दाखवली तेव्हा दत्ता डावजेकर थरारून गेले, असे ते सांगत. आणि त्यांनंतर वसंत प्रभू यांनी ‘शिकलेली बायको’ या चित्रपटातल्या ‘आली हासत पहिली रात’ हे गाण्याचे संगीत रचले.

हंसध्वनी रागातील काही प्रसिद्ध गीते

संपादन


(अपूर्ण)