मांड हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शक गुलाम मोहम्मद यांचा हा आवडता राग होता.

या रागाला सर्व स्वर 'शुद्ध' लागतात. हा राग दिवसाच्या कोणत्याही वेळी गाता येतो. 'सा' हा मांड रागाचा वादी व 'म' हा संवादी स्वर आहे. पण काही गायक 'पंचम'ला संवादी स्वर मानतात. तसेच काही गायक कधीकधी कोमल ‘नी’ लावतात. याच कारणाने, मांड रागाचे दोनदोन आरोह-अवरोह प्रचलित आहेत. ते आरोह-अवरोह असे :- (सां=वरचा सा)

१. आरोह- सा, ग, रे, म, ग, प, म, ध, प, नी, ध, सां

अवरोह- सां, ध, नी, प, ध, म, प, ग, रे, ग, सा.

२. आरोह- सा रे म प ध सां

अवरोह- सांनी ध प, प ग रे, सा रे गा, सा

मांड रागाचे मुख्य स्वर- धनी प, ध म, प ग रे, सा रे ग सा.

मांड रागातील गीते

संपादन