राकेल वेल्च तथा जो राकेल तेहादा (५ सप्टेंबर, १९४०:शिकागो, इलिनॉय, अमेरिका - ) ही अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका आहे. हिने इंग्लिश चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला.

कौटुंबिक माहितीसंपादन करा

वेल्चचे वडील आर्मांदो कार्लोस तेहादा उर्किझो हे बोलिव्हियामध्ये जन्मलेले विमानअभियंता होते तर आई जोसेफिन सॅराह हॉल ही स्थापत्यशास्त्रज्ञ एमेरी स्टॅनफर्ड हॉलची मुलगी होती. वेल्च आपल्या आईकडून मेफ्लॉवर जहाजातून आलेल्या लोकांपर्यंत आपले कुळ सांगू शकते.

कारकीर्दसंपादन करा

वेल्चने नाट्यशास्त्रात शिष्यवृत्ती मिळवून सान डियेगो स्टेट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे असतानाच वयाच्या १९व्या वर्षी द रमोना पॅजंट या उघड्यावर होणाऱ्या नाटकात प्रमुख भूमिका केली. त्यानंतर तिला सान डियेगोमधील दूरचित्रवाणी केन्द्रावर हवामान सांगण्याचे काम मिळाले. त्यानंतर काही काळाने वेल्चने शिक्षण सोडले. आपला नवरा जेम्स वेल्चपासून घटस्फोट घेतल्यावर राकेल आपल्या मुलांसह डॅलस येथे स्थलांतरित झाली व तेथे तिने लहानमोठी कामे केली. १९६३मध्ये आधी न्यू यॉर्क व नंतर लॉस एंजेल्सला राहण्यास गेल्यावर राकेल वेल्चने चित्रपटांतून भूमिका करण्यास सुरू केले. आपण लॅतिना असल्याचे उघड न करण्यासाठी तिच्या एजंट[मराठी शब्द सुचवा] (आणि नंतरचा पती) पॅट्रिक कर्टिस व तिने राकेलच्या भूतपूर्व पती जेम्स वेल्चचे आडनाव लावणे सुरू केले. १९६४ पासून तिला अनेक चित्रपटांतून प्रमुख भूमिका मिळाल्या व तिची कारकीर्द सुरू झाली.