रवी परांजपे (९ ऑक्टोबर १९३५ बेळगाव - ११ जून २०२२ [१] पुणे ) हे चित्रकार, बोधचित्रकार होते. ते भारतीय चित्रकला शैलीत चित्र काढत असत. त्यांनी प्रकाशन, जाहिरात, वास्तुशिल्पशास्त्र या क्षेत्रांत भारतामध्ये काम केले. नंतर त्यांनी नैरोबी, केन्यामध्ये काम केले.

रवी परांजपे

जन्म ९ ऑक्टोबर १९३५
बेळगांव
मृत्यू ११ जून २०२२
पुणे
कार्यक्षेत्र चित्रकला

परांजपे यानी जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमधून संशोधनपर लेखन केले आहे.

पुस्तके संपादन

  • नीलधवल ध्वजाखाली (लेखसंग्रह)
  • ब्रश मायलेज (आत्मकथन)
  • शिखरे रंग रेषांची (परदेशी चित्रकारांचा परिचय ग्रंथ)

सन्मान आणि पुरस्कार संपादन

  • द बॉम्बे आर्ट सोसायटीचा रूपधर हा जीवनगौरव पुरस्कार (२०२२) [२]
  • ‘कम्युनिकेशन आर्ट्‌स गिल्ड हॉल ऑफ फेम’ हा जीवनगौरव पुरस्कार [१]
  • ‘द ग्रीन एकोज’ या निसर्गचित्राला मिळालेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार (२०१२)
  • दयावती प्रतिष्ठानचा पुरस्कार
  • ‘ब्रश मायलेज’ या पुस्तकासाठी भैरूरतन दमाणी पुरस्कार [२]
  • शारदा ज्ञानपीठम्‌‍कडून ऋषितुल्य व्यक्ती म्हणून पूजन (६-९-२०१६)

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ a b "ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे निधन". Loksatta. 2022-06-13 रोजी पाहिले.
  2. ^ a b "ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे निधन". eSakal - Marathi Newspaper. 2022-06-13 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन