रण गोजा
रण गोजा (इंग्लिश:Central Asian Desert Wheatear or Desert chat) हा एक पक्षी आहे.
नर: या पक्ष्याचा माथा व पाठ पिवळसर व भुवई पिवळट असते.शेपटीखालील भाग सायीच्या वर्णाचा आणि इतर भाग काळसर तपकिरी असतो. कंठ व डोक्याच्या बाजूच्या भागाचा रंग काळा असतो. इतर खालील भाग पिवळट पांढरा असतो.
मादी: ही दिसायला नरासारखी असते. मात्र अधिक राखी रंगाची असते. पंख व शेपूट फिक्का तपकिरी व कानाभोवतीचा रंग तांबूस तपकीर असतो. खालील वर्ण पांढुरका पिवळट असून छातीचा रंग गर्द असतो.
वितरण
संपादनपाकिस्तान व भारताच्या पूर्वेला बिहार व दक्षिणेकडे उत्तर आंध्र प्रदेश व मध्य महाराष्ट्र या भागात आढळतात.
संदर्भ
संपादन- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली