र.धों. धोपेश्वरकर

(रघुनाथ धोंडो धोपेश्‍वरकर या पानावरून पुनर्निर्देशित)

रघुनाथ धोंडो धोपेश्‍वरकर उर्फ र.धों. धोपेश्वरकर (१९०२ - १९७४) हे मराठी चित्रकार होते.

र. धों. धोपेश्‍वरकर

पूर्ण नावरघुनाथ धोंडो धोपेश्‍वरकर
जन्म १९०२
मृत्यू १९७४
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रकला, कलाअध्यापन
प्रशिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई

कारकीर्द

संपादन

१९३० साली धोपेश्वरकरांनी महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट टाकून चित्रकलेचे शिक्षण घ्यायचे ठरवले. तोवर त्यांनी इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले होते. मुंबईतल्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेमध्ये प्रवेश घेऊन १९३० - १९४१ सालांदरम्यान धोपेश्वरकर तेथे चित्रकला शिकले[]. पुढे त्याच संस्थेत १९५८ साली सेवानिवृत्तीपर्यंत त्यांनी कलाअध्यापन केले.

संदर्भ

संपादन
  1. ^ 'महाराष्ट्रातील कलावंत', ले.: बाबुराव सडवेलकर, ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे, इ.स. २००५, पृ. १०३ - १०६, ISBN 81-7925-120-9