योकोझे, सैतामा

कांतो, जपानमधील शहर

योकोझे (横瀬町, योकोजे-माची) हे जपानमधील सैतामा प्रांतामधील एक शहर आहे. १ मार्च २०२१ पर्यंत या शहराची अंदाजे लोकसंख्या ८,१०६ होती. या शहरामध्ये ३३४७ घरे होती. लोकसंख्येची घनता १७२ व्यक्ती प्रति वर्ग किमी होती.[१] या शहराचे एकूण क्षेत्रफळ ४९.२६ चौरस किमी (१९.०२ चौ. मैल) आहे.

योकोझे
横瀬町 
शहर
योकोजे शहरातील मुख्य कार्यालय
योकोजे शहरातील मुख्य कार्यालय
Flag of योकोझेOfficial seal of योकोझे
सैतामा प्रांतातील योकोजेचे स्थान
सैतामा प्रांतातील योकोजेचे स्थान
योकोझे is located in जपान
योकोझे
योकोझे
 
गुणक: 35°59′14.3″N 139°6′0.3″E / 35.987306°N 139.100083°E / 35.987306; 139.100083गुणक: 35°59′14.3″N 139°6′0.3″E / 35.987306°N 139.100083°E / 35.987306; 139.100083
देश जपान
विभाग कांटो
प्रांत प्रांत
जिल्हा चिचिबु जिल्हा
क्षेत्रफळ
 • एकूण ४९.३६ km (१९.०६ sq mi)
लोकसंख्या
 (फेब्रुवारी २०१६)
 • एकूण ८,१०६
 • लोकसंख्येची घनता एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
Time zone UTC+९ (जपान मानक वेळ)
- झाड एसर
- फुल सकुरा
- पक्षी किंगफिशर
Phone number ०४९४-२५-०१११
पत्ता योकोझे ४५४५, योकोझे-माची, चिचिबु-गुन, सैतामा-केन ३६८-००७२
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
बुको पर्वत

भूगोल संपादन

हे शहर पश्चिम सैतामा प्रांतामध्ये स्थित आहे. माऊंट बुकोच्या उत्तरेस आहे. योकोझे हे चिचिबू मैदानाच्या आग्नेय भागात आहे. हे चिचिबू शहराच्या मध्यापासून फक्त १.५ किलोमीटर (०.९३ मैल) अंतरावर आहे. शहराच्या वायव्येकडे जाणाऱ्या योकोस नदीच्या खोऱ्यातील काही सपाट जमिनीसह बहुतेक शहर डोंगराळ भागात मोडते, या शहरात टाऊन हॉल आहे.

आसपासच्या नगरपालिका संपादन

सैतामा प्रांत

हवामान संपादन

योकोझमध्ये दमट उपोष्णकटिबंधीय हवामान (कोपेन सीएफए ) आहे. ज्यामध्ये उबदार उन्हाळा आणि हलका ते हिमवर्षाव नसलेला थंड हिवाळा आहे. योकोझेचे सरासरी वार्षिक तापमान १२.४ °से (५४.३ °फॅ) आहे. येथील सरासरी वार्षिक पर्जन्यमान १७४६ मिलीमीटर आहे. सप्टेंबर हा सर्वात जास्त पावसाचा महिना आहे. ऑगस्टमध्ये सरासरी तापमान २३.७ °से (७४.७ °फॅ) च्या आसपास असते. जानेवारी मध्ये सर्वात कमी तापमान म्हणजे १ °से (३४ °फॅ) च्या आसपास असते.[२]

लोकसंख्याशास्त्र संपादन

जपानी जनगणनेच्या आकडेवारीनुसार, [३] योकोजेची लोकसंख्या गेल्या ५० वर्षांपासून तुलनेने स्थिर आहे.

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १९२० ५,६१६
इ.स. १९३० ६,३४५ +१३%
इ.स. १९४० ६,३५९ +०%
इ.स. १९५० ७,१९६ +१३%
इ.स. १९६० ७,१६३ −०%
इ.स. १९७० ८,०९० +१२%
इ.स. १९८० ९,५११ +१७%
इ.स. १९९० १०,०७३ +५%
इ.स. २००० ९,७८२ −२%
इ.स. २०१० ९,०३७ −७%

इतिहास संपादन

१ एप्रिल १८८९ रोजी आधुनिक नगरपालिका प्रणालीच्या स्थापनेसह सायतामाच्या चिचिबु जिल्ह्यात योकोझे गावाची निर्मिती करण्यात आली होती. स.न. १९५५ मध्ये, योकोझेने शेजारच्या आशिगाकुबो गावाला जोडले गेले. १ ऑक्टोबर १९८४ रोजी याला शहराचा दर्जा देण्यात आला.

सरकार संपादन

योकोझे एक महापौर परिषद आहे. येथे थेट निवडून येणारा महापौर असतो. यात एकाच पक्षाचे १२ सदस्य शहर परिषदेत असतात. योकोझे, हिगाशिचिचिबु, मिनानो, नागातोरो आणि ओगानो या शहरांसह, सैतामा प्रांताच्या असेंब्लीमध्ये एक सदस्याचे योगदान असते. राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने, हे शहर जपानच्या डाएटच्या खालच्या सभागृहातील सैतामा ११ व्या जिल्ह्याचा भाग आहे.

अर्थव्यवस्था संपादन

चिचिबू शहराच्या जवळ असल्यामुळे योकोझे हा मुख्यतः प्रवाशांचा समुदाय आहे. माउंट बुको पासून उत्पादित चुनखडीची खाण हा मुख्य उद्योग आहे.

शिक्षण संपादन

योकोझेमध्ये एक सार्वजनिक प्राथमिक शाळा आणि एक सार्वजनिक माध्यमिक शाळा आहे जी शहर सरकारद्वारे चालवली जाते. गावात हायस्कूल नाही.

वाहतूक संपादन

रेल्वे संपादन

 </img> चिचिबू रेल्वे

  • Ashigakubo - Yokoze

महामार्ग संपादन

  • राष्ट्रीय मार्ग २९९

स्थानिक आकर्षणे संपादन

  • बुको माउंट
  • चिचिबू ३४ कॅनन अभयारण्य

संदर्भ संपादन

  1. ^ "Yokoze town official statistics" (जपानी भाषेत). Japan.
  2. ^ Yokoze climate data
  3. ^ Yokoze population statistics

 

बाह्य दुवे संपादन