येवती हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील एक गाव आहे.

  ?येवती

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर धर्माबाद
जिल्हा नांदेड जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

भौगोलिक स्थान

संपादन

हवामान

संपादन

नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ७० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.

लोकजीवन

संपादन

येथील लोक प्रत्येक सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतात. हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध धर्मीयांतील लोक एकमेकांचे सण व उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करतात.

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

येवती ह्या गावात हेमाडपंथी महादेवाचे मंदिर असून दगडावर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या बाजूला बारव आहे. तसेच येथे एक हनुमानाचे मंदिर असून सन 1984 पासून नियमितपणे संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा निमित्ताने हरिनाम सप्ताहाचे आयोजन केल्या जाते.

नागरी सुविधा

संपादन

येवती हे गाव धर्माबाद तालुक्यापासून उत्तरेस 10 किमी अंतरावर आहे. येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस पूर्वी चालत होत्या, आता मानव विकासचे बसेस चालतात. खाजगी वाहनाने येथे प्रवास करता येतो. दिवाबत्तीची उत्तम सोय असून सार्वजनिक नळ सोलार सिस्टीमद्वारे कार्यान्वित केलेली आहे. सिंगल फेज सिस्टीममुळे विद्युत सेवा सुरळीतपणे चालू असते. जिल्हा परिषद प्राथमिकची पहिली ते आठवी पर्यंतची डिजिटल शाळा आहे.

जवळपासची गावे

संपादन

येवती गावाच्या पूर्वेस व उत्तरेस तेलंगणा, पश्चिमेस बाभूळगाव तर दक्षिणेस येताळा ही गावे आहेत.

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate