येड्यांची जत्रा हा २०१२चा विनोदी मराठी चित्रपट आहे. मिलिंद कावडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले असून चित्रपटात भरत जाधव, मोहन जोशी आणि विनय आपटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ३ फेब्रुवारी २०१२ रोजी तो प्रदर्शित झाला.[]

येड्यांची जत्रा
दिग्दर्शन मिलिंद कावडे
निर्मिती मिलिंद कावडे
कथा मिलिंद कावडे
पटकथा मिलिंद कावडे
प्रमुख कलाकार भरत जाधव
मोहन जोशी
विनय आपटे
श्वेता तिवारी
संवाद प्रकाश भागवत
संकलन विजय कोचीकर
छाया शामला भास्कर
संगीत क्षितिज वाघ
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ३ फेब्रुवारी २०१२
अवधी २ तास १९ मि


ही कथा दोन भागांत विभागलेल्या मराठवाड्यातील गाढवेवाडी या काल्पनिक गावातील आहे. या भागांत एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी भानगडे पाटील (जोशी) आणि कडू अण्णा पाटील (आपटे) यांची हुकूमत आहे.

हऱ्या (भरत जाधव)ची अडचण अशी आहे की तो सीमेच्या मध्यभागी, तसेच गावातील "डंपिंग" ग्राउंडमध्ये अडकला आहे.

तो त्याच्या शेतात शौचास बसलेल्या लोकांचा पाठलाग करत असताना, हऱ्याला गावापासून दूर जीवनाची स्वप्ने पडतात, परंतु तो आपल्या वृद्ध आजोबांसाठी तिथेच राहतो. बाहेर शौच करणाऱ्यांच्या कौटुंबिक भूमीची सुटका करीन हा हऱ्याचा शब्द घेतल्यानंतर आजोबाचे निधन होते.

जहागीरदार भांगडे पाटील याचा हऱ्याच्या जमिनीवर डोळा आहे, तर हर्याला त्याची मुलगी संगी (कुलकर्णी) आवडते, आणि त्याचवेळी कडू अण्णांचा मुलगा नयनराव (कांबळे)ला देखील ती हवी आहे. नंतर, हऱ्या गावात शौचालय बांधण्यासाठी एक सरकारी योजना आणतो. ज्याला गावातले लोक विरोध करतात.

भूमिका

संपादन
  1. हऱ्या - भरत जाधव
  2. कडू अण्णा पाटील - विनय आपटे
  3. भांगडे पाटील - मोहन जोशी
  4. मोहन - महेश राऊत
  5. राणी - मोनिका पंडित
  6. संगी - स्नेहा कुलकर्णी
  7. नयनराव - पंढरीनाथ कांबळे

संदर्भ

संपादन
  1. ^ "Watch Yedyanchi Jatra Full Movie Online, Release Date, Trailer, Cast and Songs | Comedy Film". www.digit.in (इंग्रजी भाषेत). 2022-01-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-18 रोजी पाहिले.