यादें (१९६४ चित्रपट)
यादें हा १९६४ चा कृष्णधवल हिंदी चित्रपट असून दिग्दर्शित आणि निर्मिती सुनील दत्त यांनी ह्यात अभिनेय पण केला आहे. संपूर्ण चित्रपटात दिसणाते ते एकमेव अभिनेता म्हणून चित्रपटात दिसतात. या चित्रपटातील दत्तची पत्नी नर्गिस दत्त ही अंतिम दृश्यात केवळ सावली म्हणून दिसते.[१]
1964 film by Sunil Dutt | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार | |||
पटकथा | |||
निर्माता | |||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
हा चित्रपट चित्रपटसृष्टीतील पहिला भारतीय चित्रपट आहे ज्यामध्ये फक्त एकच अभिनेता आहे आणि म्हणूनच कथनात्मक चित्रपटातील सर्वात कमी कलाकारांच्या श्रेणीमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ह्याची नोंद झाली आहे.[२][३]
चित्रपटात लता मंगेशकर यांनी गायलेली दोन गाणी आहे व वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केले आहे.[४]
कथानक
संपादनहा चित्रपट एका माणसाचे स्वगत आहे ज्याला आपली पत्नी आणि मुलगा घरी नसल्याचे समजते. तो असे गृहीत धरतो की ते त्याला सोडून गेले आहेत आणि त्यांच्यासोबतच्या आयुष्याची आठवण करून देणारे क्षण आठवतो. त्यांच्याशिवाय आपल्या आयुष्याची त्याला भीती वाटते व त्याला आपल्या भूतकाळातील अविवेकाबद्दल पश्चात्ताप होतो.
संगीत
संपादन- "राधा तू हैंदिवानी" - लता मंगेशकर
- "देखा है सपना कोई" - लता मंगेशकर
पुरस्कार
संपादन- १९६४: राष्ट्रीय पुरस्कार
- १९६६: फिल्मफेअर पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर - एस. रामचंद्र (कृष्णधवल श्रेणी)
- सर्वोत्कृष्ट संगीत - एसा एम. सूरतवाला
संदर्भ
संपादन- ^ "Sunil Dutt's 'Yaadein': A one-man act film is in the Guinness Book of World Records". India Today. 7 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 January 2024 रोजी पाहिले.
- ^ Bhumika K. "An experiment with peace". Online Edition of The Hindu, dated 2005-08-05. 2005. 28 September 2007 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 July 2007 रोजी पाहिले.
- ^ "Kannada film in Guinness". द हिंदू. Chennai, India. 2005-07-15. 2006-05-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ Sharma, Sampada (23 October 2021). "Bollywood Rewind | Yaadein: Sunil Dutt's one-man show that's ahead of its time". The Indian Express. 8 December 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 January 2024 रोजी पाहिले.