यशस्विनी सिंह देसवाल
यशस्विनी सिंह देसवाल (३० मार्च, १९९७ - ) ही एक भारतीय नेमबाज आहे. २०१९ साली रिओ दे जानेरो येथे आयोजित आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत तिने १० मीटर एर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले आणि २०२१ मध्ये होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी स्थान पक्के केले.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी
संपादनयशस्विनी देसवालचा जन्म 30 मार्च 1997 रोजी नवी दिल्लीत झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी यशस्विनीने नेमबाजीत पदार्पण केले, आणि त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. दरवर्षी आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना तसंच राष्ट्रीय स्पर्धांमध्येसुद्धा तिने स्वतःची कामगिरी सतत उंचावत ठेवली आहे. 2010मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित कॉमनवेल्थ गेम्समधील नेमबाजी स्पर्धा ती तिच्या वडिलांसोबत पाहण्यासाठी गेली होती, तेव्हापासून तिला नेमबाजीची आवड निर्माण झाली.[१]
देसवाल सांगते की नेमबाजी या खेळासाठी भारतात अनेक आव्हाने असल्याचे तीला जाणवले, कारण इथे या खेळासाठी पायाभूत सुविधा आणि उपकरणे अगदी मर्यादित आहेत. परंतु तिचे वडील, जे एक पोलीस अधिकारी आणि क्रीडाप्रेमी आहेत, त्यांनी तिला मनापासून पाठिंबा दिला.
तिने 10 मीटर प्रकारात एर पिस्तुल नेमबाजी करण्यास सुरुवात केली. मग तिच्या पालकांनी पंचकुला, चंदीगड येथील त्यांच्या राहत्या घरी तिच्या नेमबाजीच्या सरावासाठी एक शूटिंग रेंज तयार केली. आंतरराष्ट्रीय नेमबाज निवृत्त पोलीस महानिरीक्षक टी. एस. ढिल्लो हे तिचे प्रशिक्षक झाले. डिसेंबर 2014मध्ये पुणे येथे आयोजित 58व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत यशस्विनीने विविध प्रकारात 3 सुवर्ण पदके जिंकली, आणि तिच्या आईवडिलांच्या तिच्यावरच्या विश्वासाचे सार्थक केले.[१]
यशस्विनीने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही आपली उत्कृष्ट कामगिरी करणे सुरू ठेवले. जून 2017 मध्ये जर्मनीतील सूल येथे आयोजित आयएसएसएफ (आंतरराष्ट्रीय स्पोर्ट शूटिंग फेडरेशन) जुनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्ण पदक जिंकले आणि एका जागतिक विक्रमाशी बरोबरी केली.[२]
देसवालला केवळ तिच्या खेळातील आव्हानांनाच सामोरे जावे लागले असे नाही, तर त्याबरोबर आपल्या शालेय शिक्षणाकडेही तिने लक्ष दिले. सुरुवातीच्या काळात हे फक्त तिच्यासाठीच नाही तर तिच्या पालकांसाठीही तितकेच आव्हानात्मक होते, कारण त्यांना देशात आणि परदेशातही विविध स्पर्धांमध्ये सोबत जावे लागत होते.[१]
व्यावसायिक यश
संपादन2012 पासून यशस्विनीने नेमबाजीचा सराव सुरू केला. 2014 मध्ये चीनमधील नानजिंग येथे झालेल्या उन्हाळी युथ ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरली. तिथे 10 मीटर एर पिस्टल स्पर्धेच्या ती अंतिम फेरीत सहाव्या क्रमांकावर आली.
जर्मनीतील सूल येथे 2016साली झालेल्या आयएसएसएफ जुनियर वर्ल्डकपमध्ये तिने रौप्य पदक जिंकले. तर 2016 मध्ये अजरबैजान येथील कबाला येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने संघ श्रेणीत सुवर्ण पदक आणि वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.[२]
2017च्या आयएसएसएफ जुनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने 235.9 गुणांसह जागतिक पातळीवरच्या ज्युनिअर विक्रमाची बरोबरी केली, आणि सुवर्णपदक जिंकले.
रिओ दे जनेरो येथे झालेल्या 2019च्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत देसवालने सुवर्णपदक जिंकले आणि 2021मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी आपले स्थान पक्के केले.[२][१]
ऑक्टोबर 2020 मध्ये देसवालने आंतरराष्ट्रीय ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेच्या पाचव्या आवृत्तीत सुवर्णपदक जिंकले. परंतु ही स्पर्धा नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे (एनआरएआय) मान्यताप्राप्त नसल्याने यशस्विनीला एनआरएआयने त्यात भाग घेतल्याबद्दल फटकारले. मात्र, तिचे प्रशिक्षक टी. एस. ढिल्लो यांनी सांगितले की कोव्हिड-19मुळे असलेल्या निर्बंधादरम्यान तिला सामन्याच्या सरावांची आवश्यकता असल्याने बहुधा तिने या स्पर्धेत भाग घेतला असेल. परंतु भविष्यात एनआरएआयच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी तिला दिल्या.[३]
पदके:
संपादन- सुवर्णपदक - आयएसएसएफ विश्वचषक, रिओ दे जनेरो, ब्राझील, 2019
- सुवर्णपदक - आयएसएसएफ जुनियर वर्ल्ड कप, सूल, जर्मनी, 2017
- टीम स्पर्धेत सुवर्णपदक - दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा, कबाला, अजरबैजान 2016
- रौप्य पदक - एशियन चँपियनशिप, दोहा, 2019 (10 मीटर एर पिस्टल मिश्र टीम)
- रौप्य पदक - आयएसएसएफ जुनियर वर्ल्ड कप, सुहल, जर्मनी, 2016
- रौप्य पदक - आशियाई चॅम्पियनशिप, कुवेत शहर, 2014
- वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक - दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा, कबाला, अझरबैजान, 2016
- डिसेंबर 2014 मध्ये पुणे येथे आयोजित 58व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तीन सुवर्णपदके.
संदर्भ
संपादन- ^ a b c d "BBC News मराठी".
- ^ a b c "ISSF - International Shooting Sport Federation - issf-sports.org". www.issf-sports.org. 2021-03-01 रोजी पाहिले.
- ^ Service, Tribune News. "Panchkula shooter Yashaswini Singh Deswal wins gold, faces penalty". Tribuneindia News Service (इंग्रजी भाषेत). 2021-03-01 रोजी पाहिले.