यशवंत मनोहर
डॉ. यशवंत मनोहर (२६ मार्च, इ.स. १९४३ - हयात) हे एक मराठी कवी, लेखक आणि साहित्य समीक्षक आहेत.
यशवंत मनोहर | |
---|---|
जन्म |
२६ मार्च, १९४३ येरला नागपूर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता |
प्रसिद्ध साहित्यकृती | उत्थानगुंफा |
प्रभाव | डॉ. बाबासाहेब आंबेडकर, |
संकेतस्थळ | http://yashwantmanohar.com/ |
व्यक्तिगत जीवनसंपादन करा
डॉ. यशवंत मनोहर यांचे बालपण नागपूर जिल्ह्यातील येरला या छोट्याशा खेड्यात गेले. मोलमजुरी करून जमेल तसे पोटाच्या आगीला समजावणाऱ्या गरीब आईवडिलांचे ते पुत्र होते. त्यांनी खूप हालअपेष्टात राहून आपले शिक्षण केले. औरंगाबादला शिकताना त्यांना खूपदा उपाशीही राहावे लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातून १९६५ साली ते प्रथम श्रेणीत बी.ए. ऑनर्स उत्तीर्ण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातूनच एम.ए. ला ते प्रथम श्रेणीत तिसरे आले. १९८४ साली ते नागपूर विद्यापीठातून पीएच.डी. झाले. नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागातून २००३ साली ते प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले.
यशवंत मनोहर यांच्या कविता इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, बंगाली, कन्नड आदी भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत.
परिचयसंपादन करा
कारकीर्दसंपादन करा
मनोहरांचे साहित्यसंपादन करा
कवितासंग्रहसंपादन करा
- अग्नीचा आदिबंध
- उत्थानगुंफा (हा मनोहरांचा पहिला कवितासंग्रह)
- काव्यभिमायन
- जीवनकाय (?)
- जीवनायन
- तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता
- प्रतीक्षायन
- बाबासाहेब!
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक चिंतनकाव्य
- युगमुद्रा
- युगांतर
- स्वप्नसंहिता
वैचारिक निबंधलेखनसंपादन करा
- अध्यापकांपुढील जळते प्रश्न
- आजचे शिक्षण आणि अध्यापक
- आपले महाकाव्यातील नायक : शम्बूक-कर्ण-एकलव्य
- आपल्या क्रांतीचे शिल्पकार : आंबेडकर-फुले-बुद्ध
- डॉ. आंबेडकर : एक शक्तिवेध
- आंबेडकरवादी बौद्ध भिक्खू कसा असावा?
- आंबेडकरवादी विद्रोही निबंध
- आंबेडकरसंस्कृती
- डॉ. आंबेडकरांचा बुद्ध कोणता?
- डॉ. आंबेडकरांचा बुद्धधम्म
- डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली?
- डॉ. आंबेडकरांनी विपश्यना का नाकारली?
- आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा : समता सैनिक दल
- आंबेडकरी चळवळीतील अंतर्विरोध
- उजेडाची बारा भाषणे
- क्रांतिकारी पुनर्रचना
- दलित साहित्य : सिद्धान्त आणि स्वरूप
- धम्मदीक्षेचा सुवर्णमहोत्सव : तुम्हाला काय मागतो?
- प्रबोधनविचार
- बहुजन क्रांतीचे महानायक : जोतिबा फुले
- बुद्ध आणि त्याचा धम्म : सारतत्त्व
- मंडल आयोग : भ्रम आणि सत्य
- महाबुद्ध डॉ. आंबेडकर
- मूल्यमंथन
- रिपब्लिकन पक्ष : बांधणीची एक दिशा
- शिक्षकांपुढील आव्हाने
- समाजपरिवर्तनाची दिशा
समीक्षासंपादन करा
- प्रतिभावंत साहित्यिक : आत्माराम कनीराम राठोड
- निबंधकार डॉ. आंबेडकर
- आंबेडकरवादी आस्वादक समीक्षा
- आंबेडकरवादी मराठी साहित्य
- आंबेडकरी चळवळ आणि साहित्य
- दलित साहित्यचिंतक
- दलित साहित्य : सिद्धान्त आणि स्वरूप
- नवे साहित्यशास्त्र
- परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि वाड्मयीन मूल्ये
- बाळ सीताराम मेर्ढेकर
- मराठी कविता आणि आधुनिकता
- युगसाक्षी साहित्य
- आंबेडकरवादी महागीतकार : वामनदादा कर्डक
- विचारसंघर्ष
- शरच्चंद मुक्तिबोधांची कविता (संपादन)
- समाज आणि साहित्यसमीक्षा
- साहित्यसंस्कृतीच्या प्रकाशवाटा
- साहित्याचे इहवादी सौंदर्यशास्त्र
- स्वाद आणि चिकित्सा
प्रवास वर्णनसंपादन करा
- स्मरणांची कारंजी
कादंबरीसंपादन करा
- रमाई
- मी सावित्री जोतीबा फुले
- मी यशोधरा
पत्रसंग्रहसंपादन करा
- पत्रप्राजक्त
श्रद्धांजलीपर लेखसंपादन करा
- सातवा ऋतू अश्रूंचा
मनोहरांवरील पुस्तकेसंपादन करा
- डॉ. यशवंत मनोहर : नवनिर्माणाची कार्यशाळा.
- डॉ. यशवंत मनोहर : एक प्रज्ञाशील प्रतिभा.
- डॉ. यशवंत मनोहर : वेध एका युगसाक्षी प्रतिभेचा. (संपादक : प्रा. अनमोल शेंडे, युगसाक्षी प्रकाशन, नागपूर, दुसरी आवृत्ती, २००९)
मनोहरांचा काव्य संग्रह व कवितासंपादन करा
- " शब्दांची पूजा करत नाही मी, माणसांसाठी आरती गातो "
मराठी साहित्यविश्वात यशवंत मनोहरांच्या उत्थान गुंफा काव्य संग्रहाची विशेष दखल घेतली गेली. पु.ल देशपांडे म्हणतात एकाच गावात आनंदाची श्रावणझड व्हावी आणि त्याच गावच्या गावकुसाबाहेरच्या लोकांकरता तो चिरंतन ग्रीष्म असावा ह्या विसंगतीचे शोषितांच्या दुःखाचे अस्वस्थ करणार वर्णन उत्थानगुंफातील, कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही; सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे" या ओळीतून येते.[१]कलेसाठी कला, मनोरंजनासाठी कला आणि समाज परिवर्तनासाठी कला असे कलेचे भेद केले जातात या संदर्भाने यशवंत मनोहर शोषितांचा भावना मांडताना त्यांच्या कवितेतून म्हणतात
मला आनंदच देत नाही कुठली कला,
सृष्टीच्या नाना लीला
मी असूच कसा शांत समतोल
छळतात सारी शास्त्रे-पुराणे-वेदांत
गळा आवळणारे नाना धर्म पंथ'
प्रज्ञा दया पवार यांच्या मतानुसार,"वाङ्मयीन व्यवस्थेला आणि हितसंबंधी कलावादी दृष्टिकोनाला फुले-आंबेडकरवादाने प्रेरित झालेले साहित्यिक विरोध का करतात, हे मला आनंदच देत नाही कुठली कला, या कवि यशवंत मनोहरांच्या कवितेतून स्पष्ट कवितिक विधानातून स्पष्ट होते.[२]
प्रसिद्ध काव्यपंक्तीसंपादन करा
‘‘मी सुरुंगांवरून चालून पाहिले
ज्वालामुखीवर मी फुलून पाहिले
मी पुनःपुन्हा जहर खाऊन पाहिले
मला नाकारणारे जगणे मी जगून पाहिले
मी जळत्या सूर्याला उराशी कवटाळून पाहिले
मी सुखांना खूपदा दुखवून पाहिले
खूप जखमांनी घरटी बांधली माझ्यावर
खूपदा मी जगण्याशिवाय जगून पाहिले
(खूपदा: जीवनायन)
पुरस्कार आणि सन्मानसंपादन करा
- मारवाडी फाउंडेशनचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲवार्ड (२०-१२-२०१२)
- ‘समाजभूषण पुरस्कार’ दादासाहेब रूपवते प्रतिष्ठान, मुंबई, २०११
- मिलिंद समता पुरस्कार, मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद, २०११
- सम्यक जीवन पुरस्कार, परभणी, २०११
- 'स्वप्नसंहिता' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा ‘कवी केशवसुत’ पुरस्कार
- 'जीवनायन' या कवितासंग्रहाला उत्कृष्ट काव्यसंग्रहासाठीचा इचलकरंजीचा इंदिरा संत पुरस्कार
- 'जीवनायन' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र फाऊन्डेशन, पद्मश्री विखे पाटील पुरस्कार
- समता प्रतिष्ठानचा सत्यशोधक दिनकरराव जवळकर पुरस्कार (१-२-२०१५)
- औरंगाबादच्या वामनदादा कर्डक प्रतिष्ठान या संस्थेने भरविलेले पहिले अखिल भारतीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन, १५ मे २००८ रोजी औरंगाबाद येथे झाले. डॉ. यशवंत मनोहर संमेलनाध्यक्ष होते.
- सुगावा प्रकाशनातर्फे दिला जाणारा सुगावा पुरस्कार (१-८-२०१५)
- गवळी प्रतिष्ठानचा पुरस्कार
- मराठवाडा साहित्य परिषदेचा कवी कुसुमाग्रज पुरस्कार (२७-२-२०१८)
हेही पहासंपादन करा
संदर्भ आणि नोंदीसंपादन करा
- ^ पु.ल.देशपांडे. उत्थान गुंफा आकलनाचे आलेख. pp. १ ते १०. ८-१०-२०१३ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "विद्रोहाची चळवळ -Maharashtra Times". Maharashtra Times. 2011-05-01. 2018-04-09 रोजी पाहिले.