यमुनाबाई सावरकर किंवा माई सावरकर (जन्म : ४ डिसेंबर, १८८८; - ८ नोव्हेंबर, १९६३) या वि.दा. सावरकरांच्या पत्नी होत्या.[] त्यांच्या जन्म तिथीनुसार मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा, विक्रम संवत १९४५ या दिवशी झाला. इ.स. १९०१ साली त्यांचा विवाह विनायक सावरकर यांच्याशी झाला. यमुनाबाईंचे वडील भाऊराव तथा रामचंद्र त्र्यंबक चिपळूणकर हे ठाण्याच्या जवळ जव्हार पालघर() कसबे येथे राहत होते. सावरकरांच्या उच्च शिक्षणाचा  आणि लंडनला जाण्याचा भार माईच्या वडिलांनी घेतला होता. माई यांनी सावरकरांच्या रत्‍नागिरीतील सामाज सुधारक कार्यक्रमात हळद-कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांना चार मुलं होती. सावरकर लंडनमध्ये असतांना त्यांंचा मुलगा मोठा प्रभाकर यांचा मृत्यू झाला. जानेवारी १९२५मध्ये सातारा येथे त्यांना एक मुलगी प्रभात झाली. दुसरी मुलगी शालिनी ही सतत आजारी असे., ती अल्पायू निघाली, व थोड्याच दिवसात मरण पावली. मार्च १९२८मध्ये त्यांना विश्वास नावाचा मुलगा झाला. १९६३ साली माई यांचे मुंबई येथे निधन झाले.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "यमुनाबाई सावरकर - यूनियनपीडिया, अर्थ वेब विश्वकोश". hi.unionpedia.org (हिंदी भाषेत). 2019-04-13 रोजी पाहिले.
  2. ^ "Yamunabai Vinayak (Mai) Savarkar". savarkar.org (इंग्रजी भाषेत). 2023-04-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-04-13 रोजी पाहिले.