म.ल. डहाणूकर वाणिज्य महाविद्यालय

(म.ल.डहाणुकर वाणिज्याचे महाविद्यालय या पानावरून पुनर्निर्देशित)

डहाणूकर महाविद्यालय या नावाने साधारणपणे ओळखले जाणारे म.ल. डहाणूकर वाणिज्य महाविद्यालय हे मुंबई उपनगरातील वाणिज्य शाखेतील अभ्यासासाठीचे एक महाविद्यालय आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले हे महाविद्यालय पार्ले टिळक विद्यालय मंडळाने यांनी १९६०ला स्थापन केले.[] सध्या महाविद्यालयाला एन.ए.ए.सी Archived 2012-03-16 at the Wayback Machine. द्वारा अ (ए) या गुणाने पुरस्कारित केलं गेला आहे आणि १७००+ विद्यार्थ्यी शिक्षण घेत आहेत. डाॅ. ज्ञानेश्वर डोके येथील प्राचार्य आहेत.

परिचय

संपादन

या महाविद्यालयाला पूर्वी पार्ले महाविद्यालय हे नाव होते. डहाणूकर औद्योगिक समूहाकडून ३ लाख रु.ची देणगी मिळाल्यावर त्याचे नाव महादेव लक्ष्मण डहाणूकर महाविद्यालय करण्यात आले. याला राज्य सरकाराकडूनही आर्थिक मदत मिळते.

अभ्यासक्रम

संपादन
  • महाविद्यालयात वाणिज्य विषयाचे ८ उपविभाग आहेत : वाणिज्य, लेखांकन, अर्थशास्त्र, गणित आणि सांख्यिकी, मानसशास्त्र, व्यवसायिक कायदा, व्यवसायिक संवाद आणि पर्यावरण अभ्यास. वाणिज्य क्षेत्रात अन्या वैकल्पिक अभ्यासक्रम घेण्याचीही सोय आहे.
  • डहाणूकर महाविद्यालय हे व्यवस्थापन अभ्यास व वाणिज्य यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये पदवी देते. हे दोन स्वयं-वित्त अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ चांगले पर्यायच देत नाहीत तर, तर उद्योग आणि व्यवसाय प्रतिष्ठानांच्या गरजा देखील पूर्ण करतात. विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी पाच पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. व्यवसाय व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन, सामग्री व्यवस्थापन आणि मानव संसाधन विकास. अभ्यासक्रमांत बदल करण्याचे स्वातंत्र्य महाविद्यालयाला नसते कारण हा अभ्यासक्रम सुधारण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडे Archived 2012-03-16 at the Wayback Machine. एकमात्र अधिकार आहे.
  • वित्त, लेखा व लेखापरीक्षण विभागाद्वारे चित्तवेधक कार्यशाळा आयोजित केल्या जातात आणि माहितीपूर्ण अतिथी-व्याख्याने होतात.

पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक संसाधने

संपादन

डाहाणूकर काॅलेजच्या वाचनालयात ४५००० पुस्तके आहेत.  ग्रंथालयात वाणिज्य विषयासंबंधी ३० नियतकालिके येतात. बाह्य-ग्रंथालयांतूनही पुस्तके मागवता येतात. ग्रंथालयाने गरजू विद्यार्थ्यांनापुस्तक-खात्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हविद्यालयाचा संगणक-कक्ष सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत उघडे असते .महाविद्यालयातील काही विभागांमध्ये स्वतःची संगणक-प्रयोगशाळा आहे. महाविद्यालयामध्ये बैठे खेळ आणि मैदानी खेळ दोन्हींची सोय आहे आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थी महाविद्यालयाचे मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व करतात.

महोत्सव

संपादन

मुंबई शहरातील इतर महाविद्यालयांसारखा डहाणूकर महाविद्यालयाचा कुरुक्षेत्र नावाचा विशेष वार्षिक सण/महोत्सव  आहे. तो विद्यार्थ्यांना सर्व कठीण प्रसंगांविरुद्ध लढण्यास उद्युक्त करते. या उत्सवामध्ये क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका निभावतो. डहाणूकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठचं साजरा करीत असलेल्या "युवा महोत्सव" यासह विविध आंतर-महाविद्यालयीन प्रसंगांत सहभागी होतो. २०१०-१०११ या शैक्षणिक वर्षात डहाणूकर महाविद्यालयाने या महोत्सवात १६५ इतर महाविद्यालयांविरुद्ध तिसरे स्थान मिळविले होते.

संदर्भ

संपादन
  1. ^ "वेटूकॉलेज.कॉम". वेटूकॉलेज.कॉम. 2012-06-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-06-10 रोजी पाहिले.

अहवाल 

संपादन

बाह्य दुवे

संपादन