मैसुरु पॅलेस
म्हैसूर पॅलेस, ज्याला अंबा विलास पॅलेस असेही म्हणतात, हा कर्नाटकच्या म्हैसूर येथील एक ऐतिहासिक राजवाडा आणि राजेशाही निवासस्थान आहे. हा राजवाडा वाडियार घराण्याचे अधिकृत निवासस्थान आणि म्हैसूर राज्याचे आसन होते. म्हैसूरच्या मध्यभागी हा पॅलेस असून याच्या पूर्वेकडे चामुंडी टेकड्या आहेत. म्हैसूरचे वर्णन सामान्यतः 'महालांचे शहर' असे केले जाते आणि या राजवाड्यासह इतर प्रमुख सात राजवाडे या शहरात आहेत.
मैसुरु पॅलेस | |
---|---|
सर्वसाधारण माहिती | |
प्रकार | राजवाडा |
ठिकाण | म्हैसूर |
पत्ता | सयाजीराव रस्ता, आग्रहारा, चम्पराजूर, म्हैसूर, कर्नाटक, ५७० ००१ |
बांधकाम सुरुवात | १८९७ |
पूर्ण | १९१२ |
बांधकाम | |
मालकी | वाडियार राजघराणे |
वास्तुविशारद | हेन्री आयर्विन |
विकासक | कर्नाटक सरकार |
रचनात्मक अभियंता | B. P. Raghavulu Naidu (Executive Engineer Palace Division) |
आता ज्या जमिनीवर हा राजवाडा उभा आहे ती मूळतः म्हैसूर (शब्दशः, "किल्ला") म्हणून ओळखली जात होती. जुन्या किल्ल्यातील पहिला राजवाडा १४ व्या शतकात बांधला गेला होता, जो अनेक वेळा आगीत भस्म व्हायचा आणि त्यामुळे तो अनेकदा पुन्हा बांधला गेला. जुना किल्ला लाकडाचा बांधलेला होता आणि त्यामुळे त्याला सहज आग लागायची, तर सध्याचा किल्ला दगड, विटा आणि लाकडाचा आहे. सध्याची रचना १८९७ ते १९१२ दरम्यान बांधण्यात आली होती. जुना राजवाडा जळून खाक झाल्यानंतर सध्याची रचना नवीन किल्ला म्हणूनही ओळखली जाते.
म्हैसूर पॅलेस हे भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे. ताजमहाल नंतर म्हैसूर पॅलेसचा क्रमांक लागत असून इथे वर्षाला ६० लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. [१]
हेदेखील पाहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Tourism in Mysore". 22 April 2014.